मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील विरोधक सुद्धा मतदारयांद्याबाबत आक्रमक झाले आहेत. मात्र निवडणूक आयोगाची चूक दाखवण्यात व्यस्थ असणाऱ्या विरोधकांना स्वत:च्या पक्षातील आमदाराचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असलेले माहित आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावाची दोन मतदारयाद्यांमध्ये नोंदणी असल्याचा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी समोर आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. याबाबत साटम यांनी मतदारयाद्यांचे फोटो शेअर करत सांगितले आहे. दरम्यान, अमित साटम यांच्या आरोपानंतर शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेख यांनी याबाबतीत निवडणूक आयोगाची चूक असल्याचे म्हटले आहे.




माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले का? तसेच माझे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असणे ही निवडणूक आयोगाची चूक आहे, असे म्हणत शेख यांनी मतदार यादीमध्ये दुबार नाव आल्याची चूक निवडणूक आयोगाच्या माथी फोडली आहे.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन

पदभरती करा अन्यथा पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

६० टक्के रिक्त पदांमुळे कारवाईची टांगती तलवार मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत