मोहित सोमण:लुमॅक्स इंडस्ट्रीज (Lumax Industries) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात २६% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १३ कोटींच्या तुलनेत यावर्षी तिमाहीत २५.८ कोटी रूपये करोत्तर नफा (Profit after tax PAT) मिळाला आहे. तर कंपनीच्या महसूलात (Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर २४.२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८१२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १००९ कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या करोत्तर नफा मार्जिनमध्येही कुठलाही बदल झाला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.५% या तिमाहीतही कायम राहिले आहे. ईबीटा (EBITDA) मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७% तुलनेत या तिमाहीत ९% मार्जिन वाढले आहे.
एकूण कंपनीच्या ऑर्डरबुकमध्येही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. त्यामुळे नवी ऑर्डर बुक १८४० कोटींवर पोहोचली आहे. या तिमाहीपर्यंत कंपनीने २०० कोटी रूपये भांडवली खर्च (Capex) केल्याचे सांगितले आहे. गेल्या ३ वर्षात सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) २१% असल्याचे कंपनीने आपल्या निकालात स्पष्ट केले. कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग महसूलात (Total Operating Revenue) गेल्या तिमाहीतील ८११.८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १००८.६ कोटींचा महसूल मिळाला. कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८१४.४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०१०.८ कोटींवर वाढ झाली आहे.मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत डीई (Long Term Date to Equity Ratio) मध्ये मात्र ०.४% वरून ०.३% घसरण झाली आहे. तसेच डीपीएस (Dividend per share मध्ये मात्र कुठलाही बदल झालेला नाही. आरओई (Return on Equity RoE) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १६% वरून १७% वर वाढ झाली असल्याचे कंपनीच्या आकडेवारीत स्पष्ट झाले.
कामगिरीबद्दल भाष्य करताना लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक जैन म्हणाले,'आम्ही उद्योगात आघाडीची वाढ करत आहोत, तिमाहीत महसूल २४.२% ने वाढला आहे, जो एलईडी लाइटिंगचा वाढता प्रवेश आणि आमच्या मजबूत अंमलबजावणी क्षमतेमुळे आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्र सध्या मागणीच्या अनुकूल परिस्थितीचा अनुभव घेत आहे, ज्याला अलिकडच्या जीएसटी सुसूत्रीकरण आणि उत्सवाच्या हंगामामुळे पाठिंबा मिळाला आहे, ज्यामुळे ग्राहकांची भावना बळकट झाली आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर आमचे सतत लक्ष केंद्रित करणे आणि ओईएमशी दीर्घकालीन संबंधांमुळे आम्हाला आघाडीच्या ऑटोमेकर्सच्या प्रमुख मॉडेल्समध्ये नवीन व्यवसाय विजय मिळवता आले आहेत ज्यामुळे निरोगी ऑर्डर बुक मिळते, ज्यामुळे आगामी तिमाहीत चांगली दृश्यमानता मिळते.उच्च डिस्पोजेबल उत्पन्न आणि ओईएमद्वारे नियोजित अनेक नवीन मॉडेल लाँचमुळे दुसऱ्या सहामाहीत मागणीची गती मजबूत राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे.लूमॅक्स इंडस्ट्रीज उद्योगात आमचे नेतृत्व स्थान मजबूत करत असताना तंत्रज्ञानावर आधारित वाढ, ग्राहकांशी अधिक जवळीक आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध आहे.'
लुमॅक्स इंडस्ट्रीज ही १९४५ मध्ये स्थापन झालेली आणि ऑटोमोटिव्ह लाइटिंगमध्ये विशेषज्ञ असलेली एक आघाडीची भारतीय ऑटोमोटिव्ह घटक उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी लुमॅक्स-डीके जैन ग्रुपचा एक भाग आहे. जपानच्या स्टॅनली इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड सोबत दीर्घकालीन भागीदार म्हणून बाजारात कार्यरत आहे.ही कंपनी सार्वजनिकरित्या सूचीबद्ध (Listed) आहे. प्रामुख्याने मूळ उपकरण उत्पादकांना (OEMs) तसेच आफ्टरमार्केट आणि निर्यात बाजारपेठांना कंपनी सेवा देते.