ITR Aadhar- Pan Card Link: तुमचे आधार पॅन कार्ड जोडलय का? नसेल जोडल्यास लवकर जोडा नाहीतर होणारे गंभीर आर्थिक परिणाम

मोहित सोमण:आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? नसेल तर आताच जोडा कारण आता ३१ डिसेंबर २०२५ शेवटची तारीख आधार - पॅन कार्ड जोडण्यासाठी (Aadhar Pan Link) असणार आहे. यापुढे लिंक न केल्यास आपले पॅन निष्क्रिय (Inactive) होऊ शकते असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.


नव्या नियमानुसार आता हे लिकेंज लवकरात लवकर करणे विशेषतः करदात्यांसाठी व सर्व भारतीयांसाठी अनिवार्य असणार आहे. जर वेळेवर ही प्रकिया पूर्ण न केल्यास मात्र त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार कार्ड आधारित ज्यांचे पॅनकार्ड इश्यू केले गेले असले तरी अशांना मुदतपूर्व आधार पॅन लिंक करण्याचे आवाहन वित्त मंत्रालयाने केले आहे. आपल्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, जल तुम्ही मुदतपूर्व दोन्ही कार्ड लिंक केले नाहीत तर तुम्हाला आरटीआर (Income Tax Returns ITR) फाईल अथवा भरता येणार नाही तसेच उर्वरित प्रकिया होणार नाही.


त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही वाढू शकते. जर तुमचे पॅन खाते यापूर्वीच निष्क्रीय असेल तर तुम्हाला १००० रुपयांची फी भरावी लागणार आहे. वेळेत लिंक न केल्यास टीडीएस, टीसीएसपण अधिकचा भरावा लागणार आहे. तसेच अर्ज २६ AS (Form 26AS) मध्ये क्रेडिट दाखवले जाणार नाही असे मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.


त्यामुळे लवकरात लवकर आधार पॅन जोडण्यासाठी (Link) इन्कम टॅक्स खात्याच्या ई फायलिंग पोर्टलवर तुम्ही भेट देऊ शकता. इतर माहिती भरत ओटीपीसह ती पडताळणी पूर्ण झाल्यावर दोन्ही कार्ड लिंक होतील. त्यामुळेच मुदत संपवून निष्क्रीय खात्यासाठी अधिकचे १००० रुपये फी भरण्यापेक्षा वेळेत जोडणी करणे करदात्यांना किफायतशीर ठरणार आहे.


त्यामुळे काय काळजी घ्यावी?


अधिकचा दंड न बसण्यासाठी वेळेत आधार पॅन जोडणी प्रकिया पूर्ण करावी


शेवटच्या मिनिटापर्यंत जोडणीसाठी ताटकळत बसू नये कारण तांत्रिक अडचणीचाही सामना करावा लागू शकतो.


सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपली माहिती व कागदपत्रे पहिले तपासून घ्यावी.


तांत्रिकदृष्ट्या चुका टाळाव्यात.


घाईघाईत आयटीआर व आधार पॅन जोडणी टाळावी.


इन्कम टॅक्स रिटर्न पोर्टलवर आधी संपूर्ण माहिती वाचून काढावी जेणेकरून तुमची प्रकिया चुकणार नाही.

Comments
Add Comment

Nashik : आई-बाबा घराबाहेर पडले अन् घरी येताच पायाखालची जमीन सरकली, दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या