Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी सुरू होण्यास उशीर झाला आहे, कारण ऐन दिवाळीच्या काळातही राज्यात पाऊस कोसळत होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा गारवा जाणवत आहे. थंडीची सुरुवात होत असतानाच, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. माॅन्सून राज्यातून परतला असतानाही, 'मोंथा' चक्रीवादळ (Montha Cyclone) दाखल झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे राज्यात मोठे थैमान माजले. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले, इतकेच नाही तर शेतातील मातीही वाहून गेली, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 'मोंथा' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना बसला असला तरी, महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसून आले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणि पावसाच्या या बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.



पुढील २४ तासांत देशातील ४ ते ५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस!


देशातील हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठे आणि जलद बदल होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत देशातील चार ते पाच राज्यांमध्ये हवामान सतत बदलत राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. विशेषतः, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचे मोठे संकेत आहेत. केरळमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि रायमसिला या भागांमध्येही या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, देशाच्या ईशान्य भागामध्येही पावसाचे मोठे संकेत आहेत. या भागांमध्ये केवळ पाऊसच नव्हे, तर मोठे वादळ (Storm) येण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, संबंधित राज्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



राज्यात थंडीचा जोर वाढणार...


मुंबई: महाराष्ट्रात आता थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यात तापमानात चढ-उतार दिसून येत असला तरी, आगामी काळात थंडी वाढू शकते. राज्यात अतिशय तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असली तरी, बहुतांश भागात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलांमागे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण होणारे चक्राकार वारे हे प्रमुख कारण आहे. या वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातील हवामान बदलण्याची दाट शक्यता आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील थंडीवर होणार आहे. राज्याबरोबरच उत्तर भारतातही थंडी वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पाऊस झाला होता, ज्यामुळे तेथे तात्पुरता गारवा वाढला होता. मात्र, आता त्या भागातही पावसाची शक्यता कमी होऊन थंडीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत येत्या काही दिवसांत नागरिकांना अधिक थंडीचा सामना करावा लागू शकतो.



IMD चा 'उत्तर भारत'ला मोठा इशारा...


भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी हवामानाचे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात पर्वतीय वारे सक्रिय झाल्यामुळे थंडीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये थंडीची लाट येणार असून, नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश भागात पर्वतीय वाऱ्यांमुळे शनिवार (आज) आणि रविवारपर्यंत थंडीचा जोर अधिक वाढेल आणि तापमानात लक्षणीय घट होईल. थंडी वाढत असतानाच, पावसाचे ढग अजूनही पूर्णपणे हटले नाहीत, हे IMD च्या इशाऱ्यातून स्पष्ट होते. देशाच्या दक्षिणेकडील आणि बेटांच्या प्रदेशांमध्ये पुढील २४ तासांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा आणि सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत