CPI Inflation: बँक ऑफ बडोदाकडून ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर! ऑक्टोबर महिन्यातही 'बटाटा' वगळता महागाई नियंत्रणात

प्रतिनिधी:बँक ऑफ बडोदाने (Bank of India) भारतीय बाजारातील सकारात्मकता आपल्या आकडेवारीत कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालातील नव्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात सीपीआय (म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक Consumer Price Index CPI ) संबंधित महागाई आकडेवारीत आकडा ०.४ ते ०.६% पातळीवर राहू शकतो त्यामुळे, सप्टेंबर महिन्यातील तर ऑक्टोबर महिन्यात महागाई निर्देशांकातील दर मर्यादित वाढीवर राहू शकतो. त्यामुळे महागाई नियंत्रणात येऊ शकते असे बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda BoB) आपल्या अहवालात म्हटले आहे. कमोडिटीतील घसरत्या किंमती व जागतिक बाजारातील नरमाई या कारणामुळे ही महागाई वाढ मर्यादित प्रमाणातच राहिल असे अहवालात नमूद केले आहे.


सप्टेंबर महिन्यात सीपीआय महागाई गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक घसरणीसह नोंदवली गेली होती. त्यावेळी हा ग्राहक महागाई दर १.५४% होता त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दर २.०५% होता. अर्थकारणातील अनुकूलित परिस्थिती, अन्नाच्या किंमतीत झालेली घसरण याआधारे ही घसरण झाली होती. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, जीएसटी कपातीसह जीएसटी सु़धारणामुळे महागाईचा आकडा नियंत्रित राहण्यास मदत झाल्याचे म्हटले.


बँक ऑफ बडोदा ईसीआय (Bank of Baroda Essential Commodity Index ESI) या अहवालातील निरीक्षणात म्हटल्याप्रमाणे, ऑक्टोबर २०२५ मध्ये महत्वाच्या कमोडिटी अथवा वस्तूंच्या किंमतीत सलग सहाव्यांदा घसरण झाली. या निर्देशांकाची सुरूवात झाल्यापासून ही झालेली ३.६% घसरण सर्वाधिक घसरण ठरली होती. प्रामुख्याने निर्देशांकात झालेली घसरण ही अन्नाच्या किंमतीत स्वस्ताई झाल्यामुळे विशेषतः भाजीपाला किंमतीतील घसरणीमुळे झाली असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले.


अनुक्रमणिकेनुसार, हा निर्देशांक महिना बेसिसवर ०.१% घसरला आहे. मात्र अपवाद म्हणून बटाट्याच्या किंमतीत मात्र गेल्या महिन्यातील तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. सातत्याने कमोडिटीतील होणारी किंमतीतील घट ही महागाई नियंत्रणात करण्यात परिणामकारक ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हाच महागाईचा वेग भविष्यातील महिन्यात कायम राहू शकतो असे भाकीत मांडले जात आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मोठी बातमी: लाखो लोकांसाठी सेबीकडून मोठी सूचना ! खबरदार...डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताना 'ही' काळजी घ्या

मोहित सोमण:सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने केवळ आणि केवळ सेबी अधिकृत सोने गुंतवणूकीत पैसे गुंतवण्याचा

AIF Investment SEBI: पर्यायी गुंतवणूक निधी गुंतवणूकीबाबत सेबीचे लोकांना 'हे' आवाहन सेबीकडून नवे परिपत्रक जाहीर

गुंतवणूकदारांच्या अधिकारांबाबत SEBI ने मसुदा परिपत्रक प्रसिद्ध केले प्रतिनिधी:एआयएफ (पर्यायी गुंतवणूक निधी Alternative

ब्रिटिश कंपनी मिनीकडून ऑल इलेक्ट्रिक कंट्रिमन एस ई ऑल ४ कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात लॉन्च

प्रतिनिधी: ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रँड मिनी (MINI) कंपनीकडून भारतात ऑल-इलेक्ट्रिक कंट्रीमन SE All4 ही चारचाकी लाँच केली

HKSTP EPIC 2025: केवळ युए युके नाही तर सिंगापूर आणि कॅनडामधील हजारो स्टार्टअप भारतात गुंतवणूकीसाठी इच्छूक!

प्रतिनिधी: वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सिंगापूर आणि कॅनडामधील अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सनी