यशोमान आपटे अन् रुमानी खरेचं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

२१ नोव्हेंबरला शुभारंभाचा प्रयोग


मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यात आता ‘लागली पैज?’ या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चार्मिंग बॉय, तरुणाईचा आवडता चेहरा अर्थात अभिनेता यशोमन आपटे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. २१ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.


प्रभात थिएटर्सने निर्मिती केलेल्या 'लागली पैज?' या नाटकाचे निर्माते ज्योती कठापूरकर व निखिल करंडे आहेत, तर ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित या नाटकात यशोमान आपटे, रुमानी खरे यांच्यासह सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पीयूष यांनी संगीत दिले आहे, तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत. लागली पैज?’ आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांगते. गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, या नाटकातून रुमानी खरे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नात्यात प्रेम आणि महत्त्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा एकाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यावर या नाटकाचे कथानक बेतले आहे. आदित्य आणि रेवा या जोडप्यात रेवाला सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे.

Comments
Add Comment

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या

तरुण तुर्क : तोरडमल ते तोडणकर...

राज चिंचणकर, राजरंग ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या