आयटी रिअल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात अखेरच्या सत्रात जागतिक स्तरावरील पडझडीचा फटका बसला आहे. सेन्सेक्स ५४३.२७ व निफ्टी २५१.६५ अंकांनी घसरण झाली आहे. प्रामुख्याने बँक निफ्टीत झालेल्या घसरणीमुळे आज तांत्रिक सपोर्ट लेवल राखण्यास बाजारात अपयश आले. विशेषतः घसरणीत नफा बुकिंग गुंतवणूकदारांनी वाढवल्यामुळे शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सेल ऑफचे जागतिक सत्र सुरू असल्याचे पडसाद भारतीय बाजारात कायम आहे. कमोडिटी बाजारातही अस्थिरता मोठ्या प्रमाणात कायम असल्याचे दिसत आहे.
स्मॉलकॅप निर्देशांकातील घसरणीसह व्यापक निर्देशांकात सर्वाधिक घसरण १०० (०.७४%), निफ्टी ५०० (०.८०%), निफ्टी मिडकॅप ५० (०.८५%),स्मॉलकॅप (१.१९%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण आयटी (१.२९%), रिअल्टी (१.३३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.६२%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.३३%) निर्देशांकात झाली आहे. जागतिक पातळीवरील सकाळच्या सत्रात कालच्या सत्रात डाऊ जोन्स (०.१४%) वगळता इतर दोन एस अँड पी ५०० (१.१२%), नासडाक (१.९०%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.६०%), निकेयी २२५ (१.८९%), हेंगसेंग (१.१०%), तैवान वेटेड (०.४९%), कोसपी (२.८२%) निर्देशांकात घसरण झाली केवळ स्ट्रेट टाईम्स (०.०६%), जकार्ता कंपोझिट (०.२९%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिंडा कॉर्पोरेशन (६.७५%),आरती इंडस्ट्रीज (६.१६%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.०७%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (२.५२%), जीई व्हर्नोवा (२.१२%), सीसीएल प्रोडक्ट (२.११%), लिंडे इंडिया (२%), न्यूलँड लॅब्स (१.७९%), लुपिन (१.५१%),विशाल मेगामार्ट (१.४५%), कमिन्स (१.०१%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण अंबर एंटरप्राईजेस (११.७५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.२३%), अँक्शन कॉन्ट्रास्ट (४.५७%), एबीबी (३.७४%), भारती एअरटेल (३.७३%), ब्लू स्टार (३.७०%), सारेगामा इंडिया (३.५५%), जेएम फायनांशियल (३.५३%) समभागात झाली आहे.