मोहित सोमण:आज आठवड्याची अखेर शेअर बाजारात घसरणीनेच झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मात्र घसरण आटोक्यात आली आहे. मिडकॅप व मेटल, बँक निर्देशांकांच्या जोरावर शेअर बाजारातील सकाळची घसरण आटोक्यात आली आहे. सकाळी बीएसईत ५०० पूर्णांकापर्यंत व निफ्टीत २५० पूर्णांकाहून अधिक घसरण झाली होती. मात्र या शेअर्सच्या जोरावर व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वाढत्या विक्री तुलनेत घरगुती गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवत नफा बुकिंग केल्यामुळे आज शेअर बाजारात किरकोळ घसरणीवर निर्देशांक बंद झाला आहे. सेन्सेक्स ९४.७३ अंकाने कोसळत ८३२१६.२८ व निफ्टी १७.४० अंकांने घसरत २५४९२.३० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज १९९.२२ व बँक निफ्टीत आज ३२२.५५ अंकांनी वाढ झाल्याने आज बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे.
दुसरीकडे निफ्टी व्यापक निर्देशांकातही मिडकॅप ५० (०.५९%) व, मिडकॅप १०० (०.६३%), मिडकॅप ५० (०.५९%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे तर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ मेटल (१.४१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.२२%), ऑटोमोबाईल (०.५७%), फायनांशियल सर्विसेस (०.७६%), बँक (०.५६%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण आयटी (०.६२%), एफएमसीजी (०.४९%), फार्मा (०.३६%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.७२%), आयटी (०.६२%) निर्देशांकात झाली आहे.
आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर कमोडिटीतही हालचाल तेज झाल्याचे पहावयास मिळाले आहे. तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात घसरणीकडे कल पहायला मिळत आहे. गिफ्ट निफ्टी (०.०४%) सह, निकेयी २२५ (१.४८%), हेंगसेंग (०.९६%), कोसपी (१.८४%), सेट कंपोझिट (०.८०%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून वाढ जकार्ता कंपोझिट (०.६९%), स्ट्रेट टाईम्स (०.१६%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स सपाट राहिला असून उर्वरित एस अँड पी ५०० (१.१२%),नासडाक (१.९०%) घसरण झाली आहे. काल शेअर बाजारात मोठे कंसोलिडेशन व सेल ऑफ झाले होते. प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, काल गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सचे निव्वळ विक्रेते होते, त्यांनी ३२६३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) बाजाराला पाठिंबा देत राहून ५२८४ कोटी रुपयांच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले.आजही ती पुनरावृत्ती झाली आहे. अमेरिका व भारत यांच्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक वक्तव्यानंतरही अद्याप टॅरिफ कपात करण्यावरून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अस्थिरता आणखी वाढली असून अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दुसरीकडे रशियन तेल खरेदी मुद्यावर भारत व युएस यांच्यातील दरी वाढलेली असताना काही भारतीय कंपन्यानी रशियन तेल खरेदीत कपात करण्याचे ठरवले होते. त्यामुळे कमोडिटीतही अस्थिरता निर्माण झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात एल अँड टी फायनान्स (१०.३२%),बीएसई (९.०७%), स्वान कॉर्पोरेशन (७.६३%), एजंल वन (५.२२%), सीसीएल प्रोडक्ट (५.३५%) केफिन टेक्नॉलॉजी (४.६०%), सीपीसीएल (४.१५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.९७%) समभागात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण अंबर एंटरप्राईजेस (७.३३%), लेटंट व्ह्यू (७.२१%), इ क्लर्क सर्विसेस (६.३५%), साई लाईफ (५.०८%), देवयानी इंटरनॅशनल (४.९६%), गोदरेज अँग्रोवेट (४.७४%), रिलायन्स पॉवर (४.५८%), चोला फायनांशियल (४.४९%), भारती एअरटेल (४.२७%), बजाज होल्डिंग्स (४.२५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.९६%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'मुख्य आधार पातळीवर खरेदी सुरू झाल्याने सुरुवातीच्या तोट्यातून देशांतर्गत शेअर बाजार पुन्हा वधारला, जरी मिश्र उत्पन्न सावध जागतिक संकेत आणि सततचा एफआयआय बहिर्गमन असे असले तरी विशेषतः पीएसयू बँकांमुळे एफडीआय कॅप वाढ आणि क्षेत्र एकत्रीकरणाभोवतीच्या अटकळांमुळे गुंतवणूकदारांच्या वाढत्या हितामुळे याला उलटा ट्रेंड म्हणणे अकाली ठरेल. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमधून काही निवडक विभागांना पाठिंबा मिळाला, व्यापक निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली, ज्याचे नेतृत्व वित्तीय क्षेत्रातील तीक्ष्ण तेजीने केले.पुढे जाऊन, बाजार सध्याच्या गतीच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करण्यासाठी यूएस शटडाऊन आणि यूएस-भारत आणि यूएस-चीन करारांसह टॅरिफ-संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतील.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आठवड्यादरम्यान रुपया ८८.४०-८८.७५ च्या दरम्यान अस्थिर श्रेणीत व्यवहार करत होता, परंतु एफआयआयकडून विक्रीचा दबाव कायम राहिल्याने तो त्याच्या खालच्या पातळीजवळ राहिला. कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ आणि डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने देशांतर्गत चलनात अलिकडच्या काळात झालेली कमकुवतपणा आणखी वाढला, जो १०० च्या जवळ गेला. अधूनमधून खरेदीला पाठिंबा असूनही, जागतिक अनिश्चितता आणि सतत परकीय बाहेर जाण्याच्या प्रवाहात रुपयाची भावना कमकुवत राहिली. पुढील आठवड्यात, रुपयाची हालचाल अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये विस्तृत व्यापार श्रेणी ८८.२५-८८.९० च्या दरम्यान दिसून येईल.'