आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवार रात्री १.५० ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत १ तास ३० मिनिटे इतका असेल.
या ब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील: कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील.


हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर पहाटे ३.१३ ते ३.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. उशिरा धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेनुसार संचालनात्मक कारणास्तव वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Comments
Add Comment

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच

gig worker : गिग आणि डिलिव्हरी कामगारांची सक्त पडताळणी

मुंबई : महाराष्ट्रातील स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीटसारख्या असंख्य ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता

anna bhau sathe : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला गती देण्याचे निर्देश

मुंबई : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्किट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून

Mumbai : बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी वापरणार

मुंबई : पीएम आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) आणि महानगर