कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यात मोठा निर्णय घेणार ? उपकर्णधार शुभमन गिलची जागा धोक्यात!

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल मैदानावर रंगणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे हा सामना मालिकेचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.


तिसऱ्या सामन्यात काही बदल करून टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं. आता चर्चेचा विषय आहे तो चौथ्या सामन्याचा संघ. या सामन्यासाठी वन डे टीमचा कॅप्टन आणि टी २० टीमचा व्हाईस कॅप्टन अर्थात उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळणार की संघात ठेवणार या प्रश्नाचे उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.


शुभमनला मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने आतापर्यंत एकूण ५७ धावा केल्या आहेत आणि सलग दहा टी २० सामन्यांत एकदाही अर्धशतक झळकावलेलं नाही. ही कामगिरी ना संघासाठी उपयोगाची ठरत आहे, ना त्याच्या लौकिकाला साजेशी आहे.


अभिषेक शर्मा सतत चांगली कामगिरी करत असताना गिल मात्र संघर्ष करताना दिसतो आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आता गिलऐवजी संजू सॅमसनला पुन्हा संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


गौतम गंभीर यांच्या कोचिंगखाली शुभमनला संघात स्थान मिळावे म्हणून संजूच्या ओपनिंग पोजिशनमध्ये बदल करण्यात आला होता. संजू पूर्वी सलामीला खेळत होता, पण गिलच्या पुनरागमनानंतर त्याला मिडल ऑर्डरमध्ये हलवण्यात आलं. मात्र या बदलाचा काही विशेष परिणाम दिसला नाही, उलट तिसऱ्या सामन्यात संजूला संघातून बाहेर बसावं लागलं.


आता चौथ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गंभीर पुन्हा संघरचनेत बदल करतील का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.


संभाव्य भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल / संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या