Orkla Foods IPO Listing: ओरक्ला फूडचा शेअर बाजारात सूचीबद्ध 'लिस्टिंग' झाल्यावरच घसरण सुरू गुंतवणूकदारांचे नुकसान 'या' कारणामुळे

मोहित सोमण:सकाळी सूचीबद्ध होताच ओरक्ला फूडस लिमिटेडचा शेअर घसरणीकडे निर्देशित होत आहे. सकाळी ओपनिंग बेलनंतर ७३० रूपये प्राईज बँड तुलनेत केवळ ७५० रूपयाला म्हणजेच २० रूपये प्रिमियम दराने सुरु झाला. मात्र काही काळातच घसरती सुरुवात करत शेअर ३ रूपयांनी घसरत ७२७ रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येक एक लॉटमागे (शेअर गठ्ठा) गुंतवणूकदारांचे ६० रूपयांनी नुकसान झाले आहे. कंपनीने आयपीओसाठी किमान २० शेअर (१४६०० रूपये) गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांना अनिवार्य केली होती.


१६६६.५४ कोटी बुक व्हॅल्यू असलेल्या आयपीओसाठी कंपनीच्या आयपीओला ४८.७४ पटीने मजबूत सबस्क्रिप्शन मिळाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ७.०६ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ११७.६३ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५४.४२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. असे असूनही घसरलेल्या कामगिरीचा आधारे केवळ जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला होता. कंपनीची बॉटमलाईन आर्थिक वर्ष २०२४ मध्ये घसरल्याने हा जोखमीचा पर्याय तज्ञांनी दिला होता.


तिमाही बेसिसवर (QoQ) कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) नुकसान झाले होते. मार्च २०२५ मधील २५५.६९ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ७८.९२ कोटींवर घसरण झाली होती. माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ झाली असून कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफ्यात १३% वाढ झाली आहे.


२९ ते ३१ ऑक्टोबर कालावधीत कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आज कंपनी सूचीबद्ध झाली आहे. Orkla Asa, Orkla Asia Holdings, Orkla Asia Pacific Pte Ltd या कंपन्या प्रवर्तक (Promoter) आहेत. १९९६ मध्ये स्थापन झालेली ऑर्कला इंडिया लिमिटेड ही एक भारतीय अन्न कंपनी आहे जी नाश्त्यापासून ते दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण, स्नॅक्स, पेये आणि मिष्टान्न अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची ऑफर देते.


कंपनीकडे प्रतिष्ठित भारतीय ब्रँड एमटीआर फूड्स, ईस्टर्न कॉन्डिमेंट्स आणि रसोई मॅजिकचा वारसा आहे. ही कंपनी देशभरातील ग्राहकांना सेवा प्रदान करत असून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख बाजारपेठांमध्ये लक्षणीय उपस्थिती दर्शवते. शिवाय ती जीसीसी देश, अमेरिका आणि कॅनडा अशा सुमारे ४२ देशांमध्ये उत्पादने निर्यात करते.३० जून २०२५ पर्यंत, तिची विविध श्रेणींमध्ये ४०० हून अधिक उत्पादने आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, कंपनीने दररोज सरासरी २.३ दशलक्ष युनिट्स विकल्या आहेत.


ती भारतातील उत्पादन सुविधा तसेच भारतातील आणि यूएई, थायलंड आणि मलेशियामधील कंत्राटी उत्पादन सुविधांमध्ये वस्तूंचे उत्पादन करते. ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीकडे भारतात ९ उत्पादन सुविधा आहेत, ज्यांची एकूण स्थापित क्षमता १८२२७० टीपीए आहे.कंपनीकडे २८ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८३४ वितरक आणि १८८८ उप-वितरकांसह एक मजबूत वितरण नेटवर्क आहे.

Comments
Add Comment

Sambhajinagar Younger Viral Video : संभाजीनगर नामफलकाखाली लघुशंका करणे जीवावर बेतले; धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी!

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झालेल्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला

रेडिंग्टन कंपनीचा शेअर १२.५१% उसळला तर होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा शेअर ९% कोसळला

मोहित सोमण:रेडिंग्टन कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली असून मात्र होम फर्स्ट फायनान्स कंपनीच्या

बिहार विधानसभा निवडणुकीचा शेअर बाजारात होणार मोठा परिणाम? का होऊ शकतो तर तो 'या' कारणाने

मोहित सोमण: आजपासून सुरू झालेल्या बिहारच्या निवडणूकीवर गुंतवणकुदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतीय जनता

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी

Stocks to Buy Today: मोतीलाल ओसवालकडून चांगल्या रिटर्न्ससाठी 'हे' तीन शेअर खरेदी करण्याचा सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर आज खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या शेअरची

Prada : बाप रे! ५ रुपयाची सेफ्टी पिन तब्बल 'इतक्या' हजारांची, प्राडाच्या या 'लक्झरी' आयटमने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; नेमकी काय आहे चर्चा?

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लहान-मोठ्या वस्तूंचे अतुलनीय महत्त्व असते. स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते अगदी