गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प


मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान’ हे गोराई येथे उभारण्यात येणार आहे. गोराई आणि दहिसरमध्ये मॅंग्रोव्ह पार्क हे मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या मॅग्रोव्ह पार्कमुळे या प्रकल्पांमुळे वादळे, समुद्री क्षरण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक संरक्षण बळकट होणार आहे.


पीयूष गोयल उत्तर मुंबईचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यांनी सातत्याने या कामांचा आढावा घेतला असून मुंबईतील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकत्रित प्रकल्प पुनरावलोकन बैठकींच्या माध्यमातून प्रगतीवर लक्ष ठेवले आहे. नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात त्यांनी यासंबंधी शेवटचा सविस्तर आढावा घेतला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून उभे राहत असलेले गोराई मॅंग्रोव्ह पार्क आणि दहिसर मॅंग्रोव्ह पार्क हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे . यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन प्रकल्प केवळ पर्यावरणीय जाणीवेचा नवा अध्याय लिहिणार नसून उत्तर मुंबईत रोजगारनिर्मिती, पर्यटन, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधतील, असा विश्वास उत्तर मुंबईचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.


“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीकोनातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली उत्तर मुंबई हे पर्यटन, शिक्षण, पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखणारे एक आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. यामुळे थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान’ – गोराई मॅंग्रोव्ह पार्क आणि त्यानंतरचा मोठा प्रकल्प – दहिसर मॅंग्रोव्ह पार्क हे दोन्ही प्रकल्प शाश्वत पर्यटनाला चालना देतात तसेच वादळे, समुद्री क्षरण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक संरक्षण बळकट करतात.” गोराई मॅंग्रोव्ह पार्क हा महाराष्ट्र शासनाच्या मॅंग्रोव्ह सेलद्वारे विकसित होत असलेला भारताचा पहिला मॅंग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान आहे, जो गोराईच्या शांत समुद्रकिनारी परिसरात उभा राहत आहे. गोयल यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांसाठी गायक मिका सिंगची न्यायालयाला विनंती

१० एकर जमीन दान करण्याची तयारी मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू

BMC Election:बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईत १,०६५ खास ‘बेस्ट’ बस सेवेत

मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी

अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा सुरूच; बँकांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडसंदर्भातील कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च

हवा उत्तर पश्चिम मुंबईची - महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड

नितीन तोरस्कर : कोळी, आदिवासी, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू विविध जाती-धर्माच्या लोकांचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा

‘येतो मुंबईत, हिंमत असेल तर पाय कापा’!

के. अण्णामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान मुंबई : ‘रसमलाई’ आणि ‘पाय कापणे’सारख्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण १० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी मुंबई (विशेष