ठाण्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद


ठाणे  : साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणी ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टरतर्फे
डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आणि राज्यातील निवासी डॉक्टरांवरील वाढत्या अन्यायाविरोधात सुरू करण्यात आला आहे. या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्या तरी ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत.


साताऱ्यातील डॉ. संपदा यांनी आत्महत्येपूर्वी हस्तलिखित सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये एका पोलीस अधिकारी आणि त्यांच्या भाडेकरूच्या मुलाकडून गंभीर छळ होत असल्याचा आरोप केला होता. या घटनेपासून डॉक्टर दररोज मेणबत्ती पेटवून आणि काळ्या फिती बांधून डॉ. संपदा आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपला संताप व्यक्त करीत आहेत. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि पालिका मार्ड यांनी अनिश्चित काळासाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये मंगळवार, ४ नोव्हेंबरपासून ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत, मात्र, ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी निवासी डॉक्टरांनी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची, सन्मानाची आणि अधिकारांची खात्री शासनाने द्यावी त्याचबरोबर प्रशासनिक पारदर्शकता, जबाबदारी आणि मानसिक आरोग्य सहाय्य यांचा समावेश असलेली प्रणालीगत सुधारणा राबवाव्यात, अशा मागण्या केलेल्या आहेत.


न्याय लांबवणे म्हणजे न्याय नाकारणे


अनेकदा शासन आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे निवेदन दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याने डॉक्टरांनी अखेर हा कठोर निर्णय घेतला आहे. संपामुळे राज्यभरातील वैद्यकीय सेवा बाधित होण्याची शक्यता असून, रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. डॉक्टरांनी मात्र ‘न्याय लांबवणे म्हणजे न्याय नाकारणे आहे’, या भावनेने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती संपावरील डॉक्टरांनी केली आहे.

Comments
Add Comment

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली.

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी करार

प्रतिनिधी: ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी एक करार केला आहे. या भागीदारीचा उद्देश