द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.


भारतीय संघ घरच्या मैदानावर आणखी एक कसोटी मालिका जिंकण्याच्या तयारीला लागली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका सहज जिंकल्यानंतर आता भारतासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघ जाहीर केला.


१४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत भारतात ही मालिका होणार आहे. आफ्रिकेचा संघ पाकिस्तानात दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवून भारतात दाखल होणार आहे. त्यांनी काही दिवासंपूर्वी १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता आणि या मालिकेतून कर्णधार टेम्बा बवुमाचे संघात पुनरागमन झाले आहे. बवुमाला दुखापीतमुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. भारतीय खेळपट्टीवर होणाऱ्या मालिकेसाठी आफ्रिकेने सिमॉन हार्मेर, केशव महाराज व सेनुरन मुथूसामी या तीन फिरकीपटूंचा संघात समावेश करून घेतला आहे.


भारतीय संघात रिषभ पंतचे पुनरागमन झाले असून देवदत्त पडिक्कल, आकाश दीप, हेही संघात आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. एन जगदीशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागी पंत व आकाशचे पुनरागमन झाले आहे.


भारतीय कसोटी संघ : शुभमन गिल ( कर्णधार), ऋषभ पंत(उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.


दक्षिण आफ्रिका कसोटी संघ : टेम्बा बवुमा ( कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवॉल्ड ब्रेव्हिस, टॉनी डी झॉर्झी, झुबायर हम्झा, सिमॉन हार्मेर, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरन मुथूसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, त्रिस्तान स्तब्स, कायले वेरेयने.

Comments
Add Comment

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स