पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने झळकवले आहे. या अभूतपूर्व कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 5 नोव्हेंबर 2025 रोजी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेणार आहेत.


या विजयानंतर मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करत संघाचे अभिनंदन केले . त्यांनी म्हटलं होतं , "या खेळाडूंनी कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्कच्या जोरावर इतिहास घडवला आहे. हा विजय भावी पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल". आता ते प्रत्यक्ष भेटीत संघाशी संवाद साधून त्यांना विशेष सन्मान प्रदान करतील. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गौरवशाली ठरणार आहे.


मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत खेळांना राष्ट्रनिर्माणाचा अविभाज्य भाग मानत अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला 3,794 कोटी रुपयांचे विक्रमी बजेट देण्यात आले आहे, जे 2014-15 च्या तुलनेत तब्बल 130 टक्क्यांनी अधिक आहे.


‘खेलो इंडिया’ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)’ या योजना भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरल्या आहेत. TOPS अंतर्गत ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये स्टायपेंड आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते, तर ‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला मोठा मंच मिळाला आहे. आतापर्यंत 19 खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या असून 2781 पेक्षा जास्त खेळाडूंना थेट लाभ मिळाला आहे.


या उपक्रमांचा परिणाम म्हणून 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 107 पदके आणि पॅरालिम्पिकमध्ये 29 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली. देशभरातील 1057 खेलो इंडिया केंद्रे, 34 उत्कृष्टता केंद्रे आणि ‘अस्मिता महिला लीग्स’मुळे महिलांचा खेळातील सहभाग झपाट्याने वाढला आहे.या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील क्रीडा संस्कृती नव्या उंचीवर पोहोचत आहे.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या