पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने ठार मारले आहे. या नरभक्षक बिबट्याने तब्बल तिघांचा जीव घेतल्यानंतर परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आता काहीसा विराम मिळाला आहे.


गेल्या २० दिवसांत या बिबट्याने सलग तीन जणांचा बळी घेतला होता. १२ ऑक्टोबर रोजी सहा वर्षांची शिवन्या बोंबे, २२ ऑक्टोबर रोजी ७० वर्षांच्या भागुबाई जाधव आणि २ नोव्हेंबर रोजी १३ वर्षांचा रोहन बोंबे हे तिघेही त्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. या घटनांनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले, तसेच ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १८ तासांसाठी महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी संतापाच्या भरात वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पला आग लावली होती.


परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्या परवानगीने बिबट्याला पकडणे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले. या मोहिमेसाठी रेस्क्यू संस्था पुणे येथील पशुवैद्य डॉ. सात्विक पाठव, तसेच शार्प शूटर प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवला यांची नेमणूक करण्यात आली.


पथकाने कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याचा मागोवा घेतल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने पथकावर हल्ला केला, तेव्हा शार्प शूटरने अचूक नेम साधत त्याला ठार केले. प्राथमिक तपासानुसार हा सुमारे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

प्रचार करणार कधी? इच्छूक उमेदवार संभ्रमात!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच,

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन

'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी