Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा 'कार वॉश' रोमांस; किसिंग व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग!

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. हार्दिक आणि नताशा यांनी सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्ट शेअर करत आपण विभक्त होत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. काही दिवस डेट केल्यानंतर हार्दिक पांड्याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले होते, मात्र लग्नाच्या काही वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा असून, दोघे मिळून त्याचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. घटस्फोटाच्या घोषणेनंतर हार्दिक पांड्याचे नाव आता एका नवीन व्यक्तीसोबत जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक मॉडेल माहिका शर्मासोबत (Mahika Sharma) रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा (Strong Rumours) आहे. या दोघांना नुकतेच मालदीवला एकत्र जाताना विमानतळावर पाहण्यात आले होते. हार्दिक पांड्याच्या या नव्या नात्यामुळे त्याचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.



गाडी धुतानाचा रोमँटिक व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ




नुकताच हार्दिक पांड्याने आपला वाढदिवस माहिका शर्मा हिच्यासोबत मालदीवमध्ये साजरा केला. हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचे वाढदिवसाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, जे आता व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून दोघांचे एकमेकांवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. हार्दिक पांड्याने शेअर केलेला एका रोमँटिक व्हिडीओने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हे दोघे एकत्र मिळून गाडी धुताना दिसत आहेत. हार्दिक साबण लावून कापडाने गाडी स्वच्छ करत आहे, तर माहिका पाईपाने पाणी टाकत आहे. याचदरम्यान माहिकाने हार्दिकच्या गालावर अतिशय प्रेमाने किस घेतले. दोघेजण गाडी धुण्याच्या या कामातही रोमँटिक होत असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. चाहत्यांना माहिका आणि हार्दिक पांड्या यांचा हा व्हिडीओ खूप आवडत असून, ते या 'कपल'वर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिकासोबत साजरी केली दिवाळी; मुलाची आठवण कायम


हार्दिकने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तो आणि माहिका एकमेकांच्या खूप जवळ आणि रोमँटिक क्षणात दिसत आहेत. गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करतानाही हार्दिक पांड्या आपल्या मुलाला विसरलेला नाही. त्याने आठवणीने मुलगा अगस्त्यचेही फोटो शेअर केले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की, गर्लफ्रेंड माहिका हिच्यासोबत असताना देखील हार्दिक पांड्याला मुलगा अगस्त्यची आठवण येत असते आणि त्याचे त्याच्या मुलावर असलेले प्रेम कायम आहे.
हार्दिक पांड्याने यंदाची दिवाळी त्याच्या आयुष्यातील दोन आवडत्या व्यक्तींसोबत साजरी केली. मुलगा अगस्त्य आणि गर्लफ्रेंड माहिका यांच्यासोबत दिवाळी साजरी करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. हार्दिक पांड्या आता वैयक्तिक आयुष्यात पुढे सरकला असला तरी, तो पिता म्हणून मुलाची जबाबदारी आणि प्रेम जपत असल्याचे या फोटोंमधून दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी एसआयटीकडे; अटकेची संख्या ६ वर

कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी

आयसीसी टी - २० क्रमवारीत वरुण चक्रवर्तीचा डंका

अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मुंबई : भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या

जय माता दी, शिवाभिषेक आणि बरचं काही... मेस्सीला भारतीय संस्कृतीची भुरळ

जामनगर: दिग्गज फुटबॉल पट्टू लिओनेल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्टात आला असून तो आपल्या मायदेशी परतला आहे. दोन

धुक्यानं वाट लावली, लखनऊची टी ट्वेंटी रद्द झाली

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे