...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मुहूर्तमेढ अखेर रोवली गेली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला. ही निवडणूक आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक कार्यक्रम १५ डिसेंबर पर्यंत जाहीर होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पर्यंत पार पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.. ​या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आगामी राजकीय घडामोडींना गती मिळण्याची शक्यता आहे.या ताज्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून, सर्व पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.


या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य विधिमंडळ अधिवेशन पार पडले जाणार आहे. हे अधिवेशन १३ नोव्हेंबर पर्यंत असेल. त्यामुळे येत्या १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन महापालिका आणि महानगर पालिका यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घडल्यास मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पार पडली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


मुंबई महापालिकेची मुदत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. तेव्हापासून महापालिकेत प्रशासक नियुक्त आहे. मुंबईसह इतर २९ महापालिकांच्या निवडणूक लांबणीवर पडल्याने या सर्व महापालिकेच्या निवडणूक त्वरीत घेण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

एल्फिन्स्टन पूल पाडकामाला वेग; मध्य रेल्वेवर १८ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

मुंबई : मुंबईच्या प्रवासाला साक्षी राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोडवरील तब्बल १२५ वर्षे जुना पूल आता

नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता

'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने

वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई  : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास

मुंबईत मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी

फुटपाथ, गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई  : मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून लटकलेल्या जाहिरात