Ajit Pawar Funeral : गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून दादांना अखेरचा निरोप

गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंतिम दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. तिघांनीही एकत्र येत अजित पवारांच्या पार्थिवास अभिवादन केले.


महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकला आणि संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिसर शोकसागरात बुडाला.



मुलांचा शोक आणि जनसागराची गर्दी : 


पार्थ आणि जय पवार आपल्या पित्याला निरोप देताना अत्यंत भावूक झाले होते. वडिलांचा वारसा आणि त्यांची शिस्त सोबत घेऊन चालणाऱ्या या दोन्ही पुत्रांना सावरताना जवळच्या नातेवाईकांनाही कठीण जात होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बारामतीकरांनी आपल्या या 'लोकनेत्या'ला निरोप देण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती, ज्याचे रूपांतर दुपारी एका अलोट जनसागरात झाले.



"परत या, परत या ... अजितदादा परत या" : 


अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला. यावेळी कार्यकर्त्यांकडून "परत या, परत या ... अजितदादा परत या", "थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो" अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू आहे.  संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणं कठीण झालं आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा