...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण पसरले आहे. याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपीने एन्काऊंटरच्या आधी दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे असे पोलिसांना सांगितले. मात्र यावेळी केसरकरांनी नकार दिला होता. याबाबतची सविस्तर माहिती केसरकरांनी दिली आहे.


पवईत तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या ओलीस नाट्यादरम्यान घटनेतील मृत आरोपी रोहीत आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने केसरकर यांना फोन करून परिस्थितीचा आढावा दिला. मात्र केसरकरांनी रोहीत आर्यसोबत बोलण्यास नकार दिला.




केसरकरांनी रोहीतसोबत बोलण्यास नकार का दिला, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. केसरकर यांना जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की, "जेव्हा मला कळले की हा मुद्दा थकबाकीशी संबंधित आहे, तेव्हा मी पोलिसांना सांगितले की ज्या विभागाकडे त्यांची थकबाकी प्रलंबित आहे त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी रोहीत आर्यचे बोलणे करू द्या. मला कल्पना नव्हती की हे प्रकरण इतके गंभीर होईल." यानंतर झालेल्या चकमकीत रोहीतचा एन्काऊंटर झाला. त्यामुळे या प्रकरणात आता केसरकरांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडला गेला आहे.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले