मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना


मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अानुषंगाने विभागाने समन्वयाने काम करून या योजनेचा आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मंत्रालयात या योजनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे आणि मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “ही योजना राज्यातील मच्छीमार समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि मत्स्यव्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. या योजनेचा उद्देश राज्यातील मत्स्यव्यवसायाला संरचनात्मक बळ देणे, मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे, तसेच सागरी अर्थव्यवस्थेला गती देणे हा आहे. या योजनेसाठी २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) रोजी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर सविस्तर कृती आराखडा तयार करावा. या योजनेच्या आराखड्यास मंजुरीसाठी वित्त व नियोजन विभागासोबत संयुक्त बैठक घेऊन निधी, अंमलबजावणीची यंत्रणा आणि लाभार्थी निवड प्रक्रिया अंतिम करण्याचे आदेशही मंत्री राणे यांनी दिले. या योजनेत मत्स्य बंदरे, थंडसाखळी सुविधा, बर्फगृहे, मत्स्य प्रक्रिया केंद्रे, तसेच नवीन मत्स्य उत्पादन व विपणन उपक्रमांना आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. बैठकीत वनक्षेत्रातील तलावांमध्ये मासेमारीस कायदेशीर परवानगी देण्याबाबतही चर्चा झाली. सध्या काही ठिकाणी होणारी मासेमारी अनधिकृत असल्याने, त्याला कायदेशीर स्वरूप देऊन रोजगारनिर्मिती व उत्पन्नवाढीस चालना देण्याचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वन अधिवासाला कोणताही धोका निर्माण न होता ही प्रक्रिया राबविण्याचा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रारुप मतदार यादी केली प्रसिध्द

महापालिकेने केले स्पष्ट मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता

महापालिकेच्यावतीने चेंबूर येथे कार्यक्रमाचे आयोजन, येत्या २८ नोव्हेंबर रोजी पार पडणार कार्यक्रम मुंबई (खास

Dharmendra He-Man : धर्मेंद्रच्या 'ही-मॅन' नावामागील रहस्य! पडद्यावरील 'विरू'ची खरी कहाणी जाणून घ्या

भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते

"हि-मॅन’ची एक्झिट वेदनादायक" ॲड.आशिष शेलार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

'चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड' उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील

Dharmendra Last Movie : अखेरचा चित्रपट रिलीजच्या तोंडावर अन्... 'ही-मॅन' धर्मेंद्र यांनी घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र यांचा 'हा' चित्रपट ठरणार अखेरचा!

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे