लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा मार्डचा निर्णय

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक


मुंबई : केंद्रीय मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.


या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी रहिवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेल्या मुद्द्यांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मुख्यमंत्री महोदयांसोबत ‘मार्ड’च्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती दिली.


दरम्यान, सेन्ट्रल मार्डचे च्या प्रतिनिधींनी शासनाकडून अधिकृत लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. रहिवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.


राज्य शासन व मार्ड यांच्यातील पुढील चर्चेनंतर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल