ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. १२१ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपला आहे ज्यानंतर ओपिनियन पोल समोर आले आहेत ज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार बिहारमध्ये स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच बिहारमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयएनएस मॅटराइज म्हटले आहे की, एनडीएला १५३ ते १५६ जागा मिळू शकतात. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला ७६ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा ६ तारखेला पार पडणार आहे. त्याआधीच ओपनियन पोलचा हा अंदाज समोर आला आहे. जदयूला ६१ ते ६५ जागा मिळतील तर चिराग पासवान यांच्या लोजपाला ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाला या निवडणुकीत ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाआघाडीला किती जागा मिळतील?
विरोधकांच्या महाआघाडीबाबत ओपिनियन पोलमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानुसार राजदला ६२ ते ६६ जागा मिळतील तर काँग्रेसला ७ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर विकसनशील इन्सान पार्टीला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून रंगला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर ओपिनियन पोलचा अंदाज आला आहे.
इतर पक्षांना किती जागांचा अंदाज?
असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला १ ते ३ जागा मिळतील तर अपक्षांना १ ते ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. आयएनएस मॅटराइजने ओपिनियन पोल घेताना ७३ हजार २८७ लोकांशी चर्चा केली आहे. यामध्ये ३८ हजार १०९, १९ हजार ७८७ महिला आणि १५ हजार ३९० तरुणांचा समावेश होता. या सर्वेच्या अंदाजानुसार एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला ९३ ते १०२ जागा मिळू शकतात.