ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी रुपेरी पडद्यावर ‘खाष्ट सासू‘ च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.


११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना अभिनय आणि संगीताची गोडी घरातूनच मिळाली. त्यांच्या आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या नावाजलेल्या गायिका आणि अभिनेत्री होत्या. लहानपणापासूनच दयाताईंना गायिका होण्याची प्रचंड इच्छा होती. शालेय जीवनात त्यांनी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत यांचे प्रशिक्षण घेतले.


वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन समारंभात गाणे सादर केले होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यांतून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले, ज्यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला नेहमी पाठबळ दिले.


१९९० नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. दया डोंगरे यांच्या आई यमुताई मोडक या देखील अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आत्या शांता मोडक याही गायिका आणि अभिनेत्री होत्या त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. ११ मार्च १९४० ला दया डोंगरे यांचा जन्म झाला होता. त्यांना गायन क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. शालेय जीवनापासून त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीत यांचं प्रशिक्षण घेतले होते. दया डोंगरे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगाच्या वेळी गाणं म्हटले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दया डोंगरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यामधून त्यांनी अभिनय केला. ज्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले.

आव्हान, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केले. तसेच मालिका आणि नाटकांमधूनही त्या काम करत होत्या. खलनायिकेच्या भूमिका त्यांनी मोठ्या प्रमाणावर साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतलं ललिता पवार यांच्यानंतरचे खल भूमिका करणारे दुसरे नाव होते ते दया डोंगरे यांचे. मराठीसह आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत की जंग अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. १९९० नंतर त्यांनी अभिनय करणे थांबवले. २०१९ मध्ये नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन दया डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला होता.


Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी