केवळ लग्नास नकार देणे भारतीय न्याय संिहतेनुसार अात्महत्येस चिथावणी ठरत नाही: सर्वोच्च न्यायालय

पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला रद्द


नवी दिल्ली : "एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले हे खूप दुःखद आहे. तिला कदाचित वाईट वाटले असेल. एकासंवेदनशील क्षणी तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तथापि, न्यायाधीश म्हणून, आम्ही रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा निर्णय घेण्यास बांधील आहोत," असे निरीक्षण नोंदवत केवळ लग्न करण्यास नकार देणे आयपीसीच्या कलम १०७ अंतर्गत स्पष्ट केल्याप्रमाणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे," असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच एका व्यक्तीने विवाहास नकार दिल्याने एका महिलेने जीवन संपविल्याप्रकरणी पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा खटलाही न्यायालयाने रद्द केला.


महिलेने आत्महत्याप्रकरणी २०१६ मध्ये अमृतसरच्या छेहरता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या आईने आरोप केला होता की, सरकारी वकील असणाऱ्या या मुलीने विषप्राशन करून जीवन संपवले. याचिकाकर्त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते; परंतु नंतर त्याने लग्नास नकार देत विश्वासघात केला. यामुळेच महिलेने जीवन संपवले. या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या निर्णयाला संशयित आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
निपुण अनेजा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या प्रकरणातील मागील निकालांचा हवाला देण्यात आला.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे