होबार्टमध्ये मारली बाजी, Team India ने साधली बरोबरी


होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट राखून आणि तिसरा सामना भारताने ५ विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (सहा धावा), जोश इंगलिस (एक धाव) आणि मार्कस स्टोइनिस (६४ धावा) या तिघांना बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर झाला.


नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे भारतासाठी फायद्याचे ठरले. होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १८.३ षटकांत पाच बाद १८८ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ४९ आणि यष्टीरक्षक असलेल्या जीतेश शर्माने नाबाद २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावा केल्या तर जीतेश शर्माने १३ चेंडूत ३ चौकार मारत नाबाद २२ धावा केल्या. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने २५, शुभमन गिलने १५, सूर्यकुमार यादवने २४, तिलक वर्माने २९, अक्षर पटेलने १७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३, झेवियर बार्टलेटने १ आणि मार्कस स्टोइनिसने १ विकेट घेतली.


याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वीस षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सहा, मिचेल मार्शने ११, जोश इंगलिसने एक, टिम डेव्हिडने ७४, मिचेल ओवेनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ६४, मॅथ्यू शॉर्टने नाबाद २६, झेवियर बार्टलेटने नाबाद तीन धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन, शिवम दुबेने एक बळी घेतला.



कोणाचेही अर्धशतक नाही पण सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग




  1. १९७ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ब्रिस्टल २०२५ (एचएस जोस बटलर ४७)

  2. १८७ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन होबार्ट २०२५ (एचएस वॉशिंग्टन सुंदर ४९*) *

  3. १७९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका केपटाऊन २०१६ (एचएस स्टीव्हन स्मिथ ४४)


होबार्टमध्ये सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव


ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक यशस्वी टी-२० आंतरराष्ट्रीय धावांचा पाठलाग




  1. १९८ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी २०१६

  2. १९५ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी २०२०

  3. १८७ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होबार्ट २०२५ *

  4. १७७ आयर्लंड विरुद्ध स्को होबार्ट २०२२

  5. १७४ श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया जिलोंग २०१७




Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने