नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह


श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे नौदलाची संपर्क यंत्रणा आणखी सक्षम होणार आहे. नागरी जहाज आणि नौदलाचे जहाज यांच्यात आवश्यकतेनुसार संपर्क ठेवणे तसेच या जहाजांमधील फरक ओळखून त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे ही कामं आता आणखी प्रभावीरित्या होणार आहेत. इस्रोने रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रक्षेपित केलेले रॉकेट ४३.५ मीटर लांबीचे आणि ६४२ टन वजनाचे आहे. याच रॉकेटच्या मदतीने चांद्रयान ३ मोहीम राबवण्यात आली. प्रक्षेपित केलेल्या रॉकेटमधून इस्रोने CMS-03 हा ४४०० किलो वजनाचा उपग्रह अंतराळात पाठवला. हा उपग्रह नौदलासाठी GSAT-7 ची जागा घेणार आहे. भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या संपर्कासाठीच्या उपग्रहांमध्ये CMS-03 हा सर्वात मोठा उपग्रह आहे.


नियोजनानुसार संध्याकाळी LVM3-M5 रॉकेट प्रक्षेपित झाले. या मोहिमेदरम्यान अंतराळात इस्रोने C25 इंजिनच्या थ्रस्ट चेंबरला कार्यान्वित करुन इंजिनची कार्यक्षमता, स्थिरता आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीवरील नियंत्रण याची चाचणी केली. C25 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी ग्राउंड टेस्टिंग झाली होती. पण अंतराळातील चाचणी पहिल्यांदाच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली, असे इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी संगितले. हे यश इस्रोसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे इस्रोला भविष्यातील प्रक्षेपण कार्यक्रमांमध्ये स्वदेशी C25 क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यासाठी नियोजन करता येणार आहे. मोठ्या वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करणे सोपे होणार आहे. याचा थेट फायदा भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला अर्थात गगनयान आणि प्रस्तावित अंतराळ स्थानक प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनेला होणार आहे.






Comments
Add Comment

१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या

जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी

राष्ट्रीय महामार्ग बंद, २० हून अधिक उड्डाणे रद्द श्रीनगर : जम्मू विभागातील उंच भागांमध्ये शुक्रवारी जोरदार

उष्णतेत वाढ, पावसात घट? एल निनोमुळे मान्सून धोक्यात

जूननंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता नवी दिल्ली : देशात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चिन्हे दिसून येत आहेत.

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र