आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार



मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांचे अवागमन बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. कांदळवनाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कांदळवन कक्ष, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्त कठोर कारवाई करावी, असे निर्देशही गोयल यांनी दिले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, वेगवेगळी कामे तसेच नागरी सेवा-सुविधा याबाबतची आढावा बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली स्थित आर मध्य विभाग कार्यालयात झाली. याप्रसंगी गोयल यांनी विविध निर्देश दिले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बहुतांशी रस्ते काँक्रिटिकरण कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीत सुधारणा झाली आहे. वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने १० तलावांचे पुनरुज्जीवन/ सौंदर्यीकरण प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार आहे. सार्वजनिक - खासगी भागीदारी (PPP) तत्वावर हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. माहुल उदंचन केंद्राच्या जागेची समस्या मार्गी लागली आहे. दहिसर नदी, पोईसर नदीच्या काठावर मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पाणीपुरवठा नियमित वेळेत व योग्य दाबाने व्हावा, यासाठी जलवाहिन्यांचे निरीक्षण करावे, आवश्यक असेल तेथे डागडुजी करावी. पाण्याची उपलब्धता मुबलक रहावी, याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देशही गोयल यांनी दिले.

गोयल पुढे म्हणाले की, सार्वजनिक प्रसाधनगृह, सशुल्क प्रसाधनगृह या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा झाली आहे. नवीन ८ ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याचे निश्चित झाले आहे. बोरिवली येथील भगवती रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. टप्प्याटप्प्याने हे रुग्णालय वैद्यकीय सेवेत रुजू होईल. आजच्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांसाठी गायक मिका सिंगची न्यायालयाला विनंती

१० एकर जमीन दान करण्याची तयारी मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू

BMC Election:बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईत १,०६५ खास ‘बेस्ट’ बस सेवेत

मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी

अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा सुरूच; बँकांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडसंदर्भातील कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च

हवा उत्तर पश्चिम मुंबईची - महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड

नितीन तोरस्कर : कोळी, आदिवासी, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू विविध जाती-धर्माच्या लोकांचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा

‘येतो मुंबईत, हिंमत असेल तर पाय कापा’!

के. अण्णामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान मुंबई : ‘रसमलाई’ आणि ‘पाय कापणे’सारख्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण १० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी मुंबई (विशेष