वृत्तसंस्था:परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, तिमाहीतील मिश्र उत्पन्न आकडेवारीचे संकेत (दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न), जागतिक भूराजकीय अनिश्चितता आणि अमेरिकन फेडच्या दर कपातीच्या निर्णयामुळे बाजारातील अस्थिरता असूनही, सलग दुसऱ्या आठवड्यात देशांतर्गत व्यापक बाजाराने तेजी दर्शविली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १% आणि ०.७% वाढले.अशाच ट्रेंडचे प्रतिबिंब म्हणून, आठवड्यात निफ्टी मिडकॅप १०० १% आणि निफ्टी स्मॉलकॅप ०.७% वाढले.एफआयआय विक्री, कमकुवत जागतिक संकेत असूनही, व्यापक बाजार दुसऱ्या आठवड्यातही तेजी दर्शवितात
सेन्सेक्स आणि निफ्टी५० मध्ये घसरण असूनही,आठवड्यात प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक स्थिर राहिले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ४.७% वाढले, त्यानंतर तेल आणि वायू (३%), निफ्टी मेटल्स (२.५%) आणि निफ्टी एनर्जी (१.८%) यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो आणि प्रायव्हेट बँक निर्देशांकांमध्ये १% पर्यंत घसरण झाली आहे. ज्यामुळे ग्राहक केंद्रित निवडक निर्देशांकात नफा बुकिंग (Profit Booking) झाल्याचे दिसून येते.
नफा बुकिंग आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने या आठवड्यात त्यांची चार आठवड्यांची तेजीची मालिका संपली आहे आणि बाजारात ती किरकोळ घसरण झाली. एनएसईचा निफ्टी आणि बीएसईचा सेन्सेक्स अनुक्रमे ०.६५ आणि ०.५५ % घसरून २५७२२ आणि ८३९३८ पातळीवर स्थिरावला आहे.
सकारात्मक देशांतर्गत आर्थिक आकडेवारी आणि काही भारतीय कंपन्यांच्या दुर्मिळ पृथ्वी चुंबकांच्या आयातीला चीनने मान्यता दिल्याने पहिल्या तीन सत्रांमध्ये बाजारातील आशावाद वाढला.तथापि, यूएस फेडरल रिझर्व्हने त्यांचा बेंचमार्क व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने ३.७५-४% श्रेणीपर्यंत कमी केल्यानंतर गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सावधगिरीची भावना बाजारातील आकडेवारीत परावर्तित केली आहे.
प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, सलग २८ व्या आठवड्यात, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) मोठ्या प्रमाणात खरेदी केली, त्यांनी १८८०४.२६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २१०२ कोटी रुपयांचे शेअर्स विकणे सुरू ठेवले. घरगुती गुंतवणूकदारांनी (DIIs) ने ५२७९४.०२ कोटी रुपयांची जोरदार खरेदी केली, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII ) ची विक्री महिन्यातील आधारावर (QoQ) आधारावर २३४६.८९ कोटी रुपयांपर्यंत कमी झाली आहे.