आजपासून धारावीकरांसाठी विशेष मोहीम

प्रलंबित सर्वेक्षणात भाग घेता येणार


१५ नोव्हेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार


मुंबई  : विविध अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या अथवा अपुरी कागदपत्रे यांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया अपूर्ण असलेल्या धारावीतील रहिवाशांना राज्य सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावून घेण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्यावतीने (डीआरपी) दस्तावेज संकलनासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्या शनिवारपासून १५ नोव्हेंबरदरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पात्र धारावीकरांना त्यांचे आवश्यक दस्तावेज डीआरपीसमोर सादर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.


धारावीतील प्रत्येक पात्र कुटुंब पुनर्विकासापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त रहिवाशांनी घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दोन आठवड्यांच्या या व्यापक मोहिमेत अपूर्ण अथवा अंशतः पडताळणी झालेल्या प्रकरणांची नोंद पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तरी सर्व रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन निर्धारित दस्तावेज संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करावेत, असे आवाहन डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केले.


आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या धारावीकरांना प्राधान्य देण्यासाठी, परिशिष्ट २ म्हणजेच ड्राफ्ट अनेक्स्चर-२ जारी करायला सुरुवात केली आहे. तसेच ज्यांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे किंवा नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यांचा समावेश पुढील यादीत करण्यात येईल, असेही डीआरपीने स्पष्ट केले आहे.


ही मोहीम उद्या शनिवारपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत राबविली जाणार आहे. डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सर्वेक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वात धारावीमध्येच सेक्टरनिहाय तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. दस्तावेजांचे संकलन, पडताळणी आणि तक्रार निवारण अशा पद्धतीचे काम या कार्यालयांतून केले जाईल. घरोघरी जाणारे सर्वेक्षण अधिकारी आणि मध्यवर्ती कॉल सेंटरच्या माध्यमातून या मोहिमेचा कालावधी, आवश्यक दस्तावेज आणि अन्य माहिती रहिवाशांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था एनएमडीपीएलकडून करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल

मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा