नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची मागणी समोर आली आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दिल्लीचं नाव "‘इंद्रप्रस्थ’" ठेवावं, अशी मागणी केली आहे.
खंडेलवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे की, दिल्लीचा इतिहास थेट महाभारतातील पांडवांशी जोडलेला आहे. दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ केल्यास आपल्या ऐतिहासिक परंपरांचे पुनरुज्जीवन होईल. तसेच दिल्लीत पांडवांचे पुतळेही उभारावेत जेणेकरून तरुण पिढीला त्याबद्दल जाणून घेता येईल. त्यांनी पुढे सुचवलं आहे की, जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचं नाव ‘इंद्रप्रस्थ जंक्शन’, तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ‘इंद्रप्रस्थ विमानतळ’ असं करण्यात यावं. इतकंच नव्हे, तर दिल्लीतील प्रमुख चौकांमध्ये पांडवांचे भव्य पुतळे उभारावे , जेणेकरून तरुण पिढीला आपल्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल जाणून घेता येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. खंडेलवाल यांनी पत्रात नमूद केलं की, “महाभारत काळात पांडवांनी यमुनेच्या काठावर ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी उभारली होती. ते नगर समृद्ध आणि नीतिमत्तेवर आधारित होतं.
भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या मागणीमुळे आता दिल्लीचं नाव बदलण्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






