खगोलप्रेमींसाठी (Astronomy Enthusiasts) या नोव्हेंबर महिन्यात एक आनंदाची आणि खास खगोलीय घटना घडणार आहे. या महिन्यातील पौर्णिमेला 'बीव्हर मून' (Beaver Moon) म्हणून ओळखले जाते, आणि हा सुंदर चंद्र लवकरच आकाशात दिसणार आहे. हा 'बीव्हर मून' ५ नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. तारखेनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी चंद्र पूर्णपणे गोल आणि पूर्ण होईल. चंद्र त्याच्या सर्वोत्तम अवस्थेच्या आदल्या दिवशी आणि नंतरही चमकदार (Bright) आणि परिपूर्ण दिसेल. ही पौर्णिमा सलग ३ सुपरमूनपैकी दुसरी असेल. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात 'हार्वेस्ट मून' (Harvest Moon) सुपरमून होता. जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, तेव्हा तो 'सुपरमून' (Supermoon) असतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गावर फिरतो, त्यामुळे त्याचे अंतर दर महिन्याला बदलते. या सुंदर आणि मोठ्या चंद्राचे दृश्य पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
२०२५ मधील सर्वात जवळचा चंद्र; 'बीव्हर मून' पृथ्वीपासून असेल इतक्या अंतरावर
नोव्हेंबर महिन्यात दिसणारा 'बीव्हर मून' २०२५ या वर्षातील एक विशेष खगोलीय घटना असणार आहे. 'अर्थ स्काय' (EarthSky) या खगोलशास्त्रीय संस्थेनुसार, हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. हा नोव्हेंबरमधील सुपरमून (Supermoon) पृथ्वीपासून सुमारे २,२१,८१७ मैल अंतरावर असेल. या कमी अंतरामुळे चंद्र सरासरीपेक्षा थोडा मोठा आणि तेजस्वी दिसेल. २०२५ या वर्षातील ही सर्वात जवळची पौर्णिमा असेल. हा चंद्र त्यावेळी क्षितिजाच्या सर्वात जवळ असेल. त्यामुळे खगोलप्रेमींना ४ आणि ५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी या सुंदर आणि मोठ्या चंद्राचे दपाहण्याची संधी आहे, ते पाहण्यास विसरू नका.
मुंबई : मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रेल्वेच्या मध्य (Central), हार्बर (Harbour) आणि पश्चिम (Western) या तिन्ही मार्गांवर रविवारी, २ नोव्हेंबर रोजी ...
बीव्हर मून (Beaver Moon) म्हणजे काय?
यावर्षी हा चंद्र एका विशेष कारणांमुळे चर्चेत आहे, तो 'सुपरमून' (Supermoon) असणार आहे. हा बीव्हर मून २०२५ च्या तीन सुपरमूनपैकी एक आहे. यावर्षी हा चंद्र इतर सर्व पौर्णिमेच्या चंद्रांपेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळून फिरेल. जेव्हा हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, तेव्हा त्याचे अंतर सुमारे ३,५६,९८० किमी (3,56,980 km) असेल. हे कमी अंतर असल्यामुळे, हा बीव्हर मून संपूर्ण वर्षातील सर्वात जवळचा सुपरमून ठरणार आहे. कमी अंतरामुळे हा चंद्र आकाशात सरासरीपेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसेल.
'बीव्हर मून' (Beaver Moon) हे नाव कसे पडले?
नोव्हेंबर महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला 'बीव्हर मून' (Beaver Moon) असे नाव देण्यामागे एक जुनी आणि मनोरंजक परंपरा (Tradition) आहे. अनेक दशकांपासून, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला कॅलेंडरमध्ये अशा विशिष्ट नावांनी हाक मारली जात आहे. या परंपरेनुसार, प्रत्येक पौर्णिमेचे नाव त्या 'संपूर्ण चंद्रासाठी' नसून, त्या संपूर्ण महिन्यासाठी ठेवले गेले होते. 'बीव्हर मून'ला त्याचे नाव मिळाले कारण, हा वर्षाचा असा काळ आहे जेव्हा बीव्हर (Beaver) नावाचे प्राणी त्यांच्या घरात लपून राहू लागतात आणि हिवाळ्यासाठी अन्न साठवू लागतात. या प्राण्यांच्या या विशिष्ट कृतीवरून नोव्हेंबर महिन्यातील पौर्णिमेला 'बीव्हर मून' हे नाव दिले गेले.
'बीव्हर सुपरमून'नंतर पुढे काय?
नोव्हेंबरमधील 'बीव्हर सुपरमून' हा वर्षातील सर्वात जादुई दृश्यांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. जर खगोलप्रेमींना हा 'बीव्हर मून' पाहता आला नाही, तर त्यांच्यासाठी पुढील पौर्णिमेची माहिती येथे दिली आहे.
पौर्णिमेचे नाव : कोल्ड मून (Cold Moon)
कधी दिसणार : गुरुवार, ४ डिसेंबर २०२५
विशेष नाव : नाईट मून
वैशिष्ट्य : २०२५ या वर्षातील शेवटची पौर्णिमा असेल.
पौर्णिमेचे नाव : वुल्फ मून (Wolf Moon)
कधी दिसणार : ३ जानेवारी
वैशिष्ट्य : २०२६ ची पहिली पौर्णिमा
४ डिसेंबर रोजी 'कोल्ड मून' (ज्याला 'लाँग नाईट मून' असेही म्हणतात) चमकेल, जी २०२५ वर्षातील शेवटची पौर्णिमा असेल. त्यानंतर, २०२६ ची पहिली पौर्णिमा 'वुल्फ मून' (Wolf Moon) म्हणून ३ जानेवारी रोजी दिसून येईल. त्यामुळे, खगोलप्रेमींनी आपले कॅलेंडर चिन्हांकित (Mark the Calendar) करून या सुंदर खगोलीय घटना पाहण्यासाठी तयार राहावे.