Venkateshwara Swami Temple : हादरवणारी दुर्घटना! व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात (Venkateswara Swamy Temple) चेंगराचेंगरी झाली, ज्यात ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, जखमी झालेल्या अनेक भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



नेमकं काय घडलं?


श्रीकाकुलम मंदिरात कार्तिक एकादशीला चेंगराचेंगरी; गर्दी नियंत्रणाबाहेर


प्राथमिक अहवालानुसार, मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला. यामुळे लोकांमध्ये गोंधळ (Chaos) उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. गोंधळात अनेकजण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरून इतरांनी जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हा अपघात अधिक भीषण झाला. माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून, नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.



मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक




आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरातील (Kasibugga Venkateswara Temple) चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटलंय की, "काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो." त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना शक्य तितके उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यांचे निरीक्षण करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे

'शीशमहल' वाद आता चंदीगडमध्ये! भाजप-आपमध्ये तुफान जुंपली; स्वाती मालीवाल यांनीही केली केजरीवालांवर टीका

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता 'आप'चे (AAP) संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये 'शीशमहल' (Sheesh Mahal)

Beaver Moon : खगोलप्रेमींनो तयारी करा! सुपरमून पृथ्वीच्या २८,००० किमी जवळ येणार; 'या' तारखेला पाहा हा अद्भुत नजारा!

खगोलप्रेमींसाठी (Astronomy Enthusiasts) या नोव्हेंबर महिन्यात एक आनंदाची आणि खास खगोलीय घटना घडणार आहे. या महिन्यातील

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे

भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेकडे मिळाला ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा!

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महिला प्रवाशांनी गांजा तस्करी