दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. धर्मेंद्र यांचे वय ९० वर्ष आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.


प्राथमिक माहितीनुसार, धर्मेंद्र यांना कोणताही गंभीर त्रास नाही, तर हे केवळ नियमित आरोग्य तपासणी (रूटीन चेकअप) आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवसांसाठी रुग्णालयात राहण्याचा निर्णय घेतला आहे.


सूत्रांनी सांगितले आहे की “चिंता करण्यासारखं काहीच कारण नाही. धर्मेंद्रजी पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे फक्त नियमित आरोग्य तपासणीसाठीच आहे आणि ते लवकरच घरी परततील.”


सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीही धर्मेंद्र यांनी रूटीन चेकअप करून घेतला होता. त्यामुळे आता देखील खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दाखल केले असल्याचं सांगितलं जात आहे.


धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलंही पहिली वेळ नाही. २०२३ मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने मुलगा सनी देओल यांनी त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेले होते. त्यावेळी पत्नी हेमा मालिनी यांनीही स्पष्ट केलं होतं की धर्मेंद्र हे नियमित तपासणीसाठीच गेले आहेत.


धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते लवकरच अगस्त्य नंदा सोबतच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात झळकणार आहेत. अलीकडेच त्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला होता.


आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फूल पत्थर, चुपके चुपके, शोले, धरम वीर यांसारख्या अजरामर चित्रपटांनी त्यांना बॉलिवूडचा “ही-मॅन” बनवलं.


वयाच्या उत्तरार्धात असूनही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वरून आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. जुन्या आठवणी, शूटिंगचे किस्से आणि वैयक्तिक विचार ते नियमितपणे शेअर करतात.


धर्मेंद्र यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी “लवकर बरे व्हा धरम पाजी” अशा शब्दांत काळजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल

‘अबब! विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,