पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका, अफगाणिस्तानच्या "या" निर्णयाला भारताचा पाठिंबा

काबुल : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानला धक्का दिला . आता अफगाणिस्तानने देखील असाच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या दिशेने वाहणारी नदी म्हणजे कुनार नदी. या नदीवर अफगाणिस्तानने धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारा आहे. अफगाणिस्तानच्या निर्णयाला भारताने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आपण अफगाणिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांसह शाश्वत जलव्यस्थापनेसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे भारताने जाहीर केले आहे. या संदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, हेरत प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अश्या मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत असणार आहे यात काही शंका नाही.


अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या उत्तर - पश्चिम अर्थात वायव्य भागात वाहणाऱ्या कुनार नदीवर धारण बांधण्याची घोषणा केली आहे. हे धरण उभारण्यात आल्यास पाकिस्तानात वाहणाऱ्या कुनार नदीच्या पाण्याच्या प्रवाहवर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारताने घेतलेला सिंधू करार स्थगित निर्णय आणि आता हा अफगाणिस्तानचा निर्णय यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत .


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेवर ठिकठिकाणी हुशारीने हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे नुकसान झाले. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानला चर्चेसाठी बोलावले. पण ही चर्चा अयशस्वी झाली. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारताने विकासाकरिता अफगाणिस्तानला पाठिंबा आणि दहशतवादाला मदत देणाऱ्या पाकिस्तानला विरोध अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानला त्यांच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तो त्यांचा अधिकारही आहे; अशी भूमिका भारताने जाहीररित्या घेतली आहे. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे.


कुनार नदी विषयी


कुनार नदी सुमारे ४८० किलोमीटर लांबीची असून ती अफगाणिस्तानच्या पूर्वेकडून पाकिस्तानच्या उत्तर- पश्चिम अर्थात वायव्य भागात वाहते, ही नदी हिंदुकुश पर्वतरांगेतून आणि अफगाणिस्तानमधील कुनार खोऱ्यातून पुढे दक्षिण दिशेला वाहते.

Comments
Add Comment

Iran Attack : इराणचा कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

कुवेत सिटी : इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय

Trump : ट्रम्पचे विमान सापडले संकटात, नागरी विमान जवळ येऊ लागताच अमेरिकेच्या हवाई दलाने केली धावपळ

फ्लोरिडा : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण असताना फ्लोरिडाच्या आकाशात धक्कादायक घटना घडली.

इस्रायलमधील मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणचा हल्ला

तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात

US Iran Conflict अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडणार ?

Boots on Ground, तेहरान : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या

Australia's Red Sky : पाहावे ते नवलच! ऑस्ट्रेलियाचे आकाश झाले लाल; नेमकं कारण काय?

मुंबई : ऑस्ट्रेलिया मधील पश्चिम भागात अलीकडे एक विलक्षण नैसर्गिक घटना पाहायला मिळाली. २७ मार्च रोजी शार्क बे आणि

३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल

वॉशिंग्टन  : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या