मोहित सोमण: देशातील सर्वात मोठ्या ऑटो उत्पादक मारूती सुझुकीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८% वाढ होत नफा ३३४९ कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने ३१०२.५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता असे मारुती सुझुकी इंडियाने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीचा एकूण कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ४२३४४.२ कोटी रुपये मिळाला आहे जो मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत ३७४४९.२ कोटी रुपये मिळाला होता, असे कंपनीने म्हटले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या खर्चातही वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च गेल्या वर्षीच्या ३३८७९.१ कोटी रुपयांवरून ३९०१८.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
याबद्दल बोलताना मारुती सुझुकीने सांगितले आहे की,'प्रतिकूल वस्तूंच्या किमती आणि प्रतिकूल परकीय चलनातील हालचालींसह अनेक घटकांनी या तिमाहीत कंपनीच्या मार्जिनवर परिणाम केला. शिवाय, कंपनीने नमूद केले की उच्च विक्री जाहिराती, जाहिरात खर्च आणि काही मॉडेल्सवरील किंमत दुरुस्तीसाठी मर्यादित वेळ यामुळे कंपनीच्या एकूण मार्जिनवर परिणाम झाला. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत मारुती सुझुकीचा ऑपरेटिंग ईबीआयटी (EBIT) वार्षिक ७.४% घसरून ३३९४ कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत ऑटोमेकरचा ऑपरेटिंग EBIT ३६६५ कोटी रुपये झाला.'
तसेच २२ सप्टेंबरपासून जीएसटी किंमत कपातीच्या अपेक्षेमुळे ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलल्यामुळे या तिमाहीत मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री ५.१% घसरून ४४०३८७ युनिट्सवर आल्याचेही मारुती सुझुकीने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त ऑटोमेकरची निर्यात वार्षिक ४२.२% वाढून ११०४८७ युनिट्सवर पोहोचली जी कोणत्याही तिमाहीतील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
तिमाहीत मारुती सुझुकीची एकूण विक्री १.०७% वाढून ५५०८७४ युनिट्सवर पोहोचली. दुसऱ्या तिमाहीत स्थानिक बाजारपेठेत आव्हानात्मक मागणी असल्याने मारुती सुझुकीने वार्षिक विक्रीत फक्त २% वाढ नोंदवली. निर्यात मिश्रण २०० bps तिमाहीत २०% पर्यंत सुधारले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसना अपेक्षा आहे की ईबीटा (EBITDA) मार्जिन ९.८% (-२१० bp YoY) वर दबावाखाली असेल कारण ऑपरेटिंग लेव्हरेजचे फायदे जास्त सवलती आणि नवीन लाँच खर्चामुळे तिमाहीत ऑफसेट होण्याची शक्यता आहे. ऑटो मेजर दुसऱ्या तिमाहीत PAT मध्ये 8% YoY वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे.