महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार


मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. सध्या या रुग्णालयात दरवर्षी सुमारे २० अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातात. मात्र, आगामी काळात ही संख्या सहा पटीने वाढून तब्बल १२० प्रत्यारोपणांपर्यंत पोहोचणार असून, म्हणजेच प्रत्यारोपण क्षमतेत ४०० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ होणार आहे. या विस्तारामुळे थॅलेसेमिया, सिकलसेल आजार, ल्यूकेमिया आणि अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उपचारांची संधी उपलब्ध होईल.जे उपचार आतापर्यंत अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य होते, ते आवाक्‍यात येतील.


महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा तसेच ,उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली आरोग्‍य विभागामार्फत विविध सेवा सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून शीव रुग्णालयाच्या बालरोग विभागात विविध अत्याधुनिक उपचार सुविधा आणि विशेष विभागांची उभारणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला जात आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त बालरुग्णांना अत्याधुनिक आणि सुलभ उपचार उपलब्ध होणार आहेत.


लोकनेते एकनाथराव गायकवाड अर्बन हेल्थ सेंटर येथे अत्याधुनिक अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभाग उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे. जानेवारी २०२६ पासून रुग्णांना उपचारासाठी प्रवेश दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानकांनुसार सुसज्ज असलेल्या या केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र संरक्षणयुक्त वॉर्ड उपलब्ध असणार आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारा उपचाराचा नवा अध्याय सुरू होईल.



या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी ‘वेहा फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे. या संस्थेने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ही सुविधा उभारली आहे. पुढील दहा वर्षांपर्यंत केंद्राच्या संचालनाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा विस्तार हा लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे हे रुग्णालय भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील अत्याधुनिक रक्तविज्ञान व कर्करोग उपचार क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून उदयास येत आहे. मुंबईतील वंचित, दुर्बल आणि गरजू रुग्णांना उत्कृष्ट व सुलभ वैद्यकीय सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. वेहा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आम्ही आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात करत आहोत,असे डॉ जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

म्हाडासह इतर शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक, मुंबईतील इतर शौचालयेही होणार आता चकाचक आणि दुर्गंधीमुक्त

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती, पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवला

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, उबाठा आणि मनसेने खरेदी केल्या याद्या, येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली

डिसेंबरअखेर 'महामेट्रो' मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशिमिरा

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची