मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी बंद करण्यात आलेल्या ५७४ रस्त्यांपैंकी ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. उर्वरीत सर्व अर्धवट कामांना लवकरच सुरुवात करून पुढील वर्षांत पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. तसेच नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे.



मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्‍त्‍यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्‍ते वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत.



टप्‍पा १ अंतर्गत निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ६३.५३ टक्‍के तर, टप्‍पा २ अंतर्गत निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ३६.८४ टक्‍के लक्ष्‍यपूर्ती करण्‍यात आली आहे. त्यामुळे टप्‍पा १ आणि टप्‍पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. मात्र, यातील काही कामे हाती घेण्यात आल्यानंतर पावसाळ्यानंतर कामे थांबवण्यात आली होती. ही सर्व अर्धवट कामे आता पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहेत.




मुंबईत पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेली ५७४ रस्त्यांची कामे अर्धवट होती. त्यातील आतापर्यंत ४२५ रस्त्यांची कामे सुरु झालेली आहे. ही सर्व अर्धवट कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच ही कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन रस्त्यांची कामांनाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त रस्त्यांची कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर राहील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


रस्‍ते काँक्रिटीकरण(टप्‍पा १ व २)


१) रस्‍ते संख्‍या - २१२१


२) एकूण लांबी - ६९८.७३ किलोमीटर



काँक्रिट कामे पूर्ण 


१) रस्‍ते संख्‍या - ७७१


२) एकूण लांबी - १८६.०० किलोमीटर



काँक्रिट कामे अंशत: पूर्ण 


१) रस्‍ते संख्‍या - ५७४


२) एकूण लांबी - १५६.७४ किलोमीटर



सुरू होणारी काँक्रिट कामे


१) रस्‍ते संख्‍या - ७७६


२) एकूण लांबी - २०८.७० किलोमीटर

Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)