रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामध्ये ४३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती आहे.
स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या. यावेळी ताम्हिणी घाटात त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. या दरडीमध्ये मोठा दगड थेट त्यांच्या गाडीवर आदळला. ज्यामुळे गाडीचे सनरूफ फुटल्याने दगड त्यांच्या डोक्यावर पडला. दरम्यान त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली ...
या अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाकडून नियमित साफसफाई व सूचना फलक लावले जात असले तरी पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.