मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. प्रामुख्याने दबावाची पातळी अखेरच्या सत्रापर्यंत वाढल्याने बाजारात मोठे 'सेल ऑफ' झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ५९२.६७ अंकाने घसरत ८४४०४.४६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी १७६.०५ अंकाने कोसळत २५८७७.८५ पातळीवर स्थिरावला आहे. सकाळच्या सत्रात बहुतांश लार्जकॅप शेअर्समध्ये घसरण झाली असली तरी मिड कॅप समभागात वाढ झाल्याने काहीसा दिलासा किरको ळ गुंतवणूकदारांना मिळाला. प्रामुख्याने जागतिक घटनांच्या धुसर शक्यतांच्या आधारे शेअर बाजार कोसळले. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने केलेली कपातीची उत्सुकता असताना शी जिंगपींग व डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीनं तर आशावाद कायम असताना अखेरच्या सत्रात मात्र चीनच्या संदिग्ध वक्तव्यावर बाजाराने नकारात्मक दिशा पत्करली असे म्हटले गेले आहे.त्यामुळे अखेरच्या सत्रात ही नकारात्मक आशियाई बाजारात परावर्तित झाल्याने अखेर शेअर बाजारात घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी होणारे डील 'औत्सुक्याचे' अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर चीनकडून मात्र अजून 'डील' झालेले नाही मात्र बाजारात घसरणीचे वारे फिरले.
अखेरच्या सत्रात फार्मा, आयटी, बँक निर्देशांकात घसरण झाल्याने बाजारात घसरण अधिक झाली. केवळ रिअल्टी, आयटी शेअर्समध्ये घसरण वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी कल घसरणीकडेच होता. अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण शांघाई कंपोझिट (०.७४%), गिफ्ट निफ्टी (०.८७%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (०.२२%), कोसपी (०.१४%) निर्देशांकात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सीपीसीएल (९.३०%), साजिलिटी (७.२९%), भेल (६.४८%), फाईवस्टार बस फायनान्स (६.२३%), आदित्य बिर्ला कॅपिटल (५.१५%), न्यूलँड लॅब्स (४.८८%), एनएलसी इंडिया (४.६८%), एबी रिअल इस्टेट (३.९९%), सफायर फूडस (३.४१%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (४.७३%), सारडा एनर्जी (४.२१%), आयडीबीआय (३.९३%), डॉ रेड्डीज (३.८९%), एलआयसी हाउसिंग फायनान्स (३.८८%), एनएमडीसी स्टील (३.६४%), क्लीन सायन्स (३.२९%), एचएफसीएल (३.२१%), एसबीआय कार्ड (२.७७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.६६%), युनियन बँक (२.६०%), सिप्ला (२.५९%), समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' गुरुवारी भारतीय बाजारांमध्ये मंदीचे सत्र दिसून आले कारण बेंचमार्क निर्देशांक २६००० पातळीच्या खाली घसरले आणि दिवसभर तोटा वाढत राहिला. निफ्टीला उच्च पातळी राखण्यासाठी संघर्ष करावा लागला, सतत विक्री होत राहिल्याने ते खाली ओढले गेले. क्षेत्रीयदृष्ट्या, आरोग्यसेवा, धातू, औषध आणि आयटी निर्देशांकांमध्ये मोठी कमजोरी दिसून आली, जी सर्व लाल रंगात संपली. तांत्रिक आघाडीवर, निफ्टीने २५८०० पातळीच्या जवळ तात्काळ आधार क्षेत्र तयार केले आहे, तर प्रतिकार २६००० पातळीच्या आसपास मर्यादित आहे. जागतिक स्तरावर, यूएस फेडरल रिझर्व्हने २५ बेसिस पॉइंट्सनी दर कमी केल्यानंतर भावना सावध राहिल्या आणि या वर्षी आणखी सवलती देण्यास विराम देण्याचे संकेत दिले. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, दुपारी २:३० पर्यंत, १६७ घसरणीच्या तुलनेत ४८ शेअर्स पुढे जात होते, जे स्पष्ट नकारात्मक पक्षपात दर्शवते. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, LICHSGFIN, CIPLA, BHEL आणि डाबरमध्ये ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप लक्षणीय होते, जे या काउंटरमधील सक्रिय स्थिती दर्शवते.'