वस्तूंच्या उपभोगात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा मोठा निर्णय! LIC Mutual Fund कंपनीकडून नवा 'LIC Consumption Fund NFO' लाँच

मोहित सोमण:आज एलआयसी म्युच्युअल फंडने सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीचा गुंतवणूकदारांना 'परिणामकारक' फायदा पोहोचवण्यासाठी एलआयसी म्युच्युअल फंड कंझमशनचे (LIC MF Consumption Fund) अनावरण केले आहे. हा नवा एनएफओ ग्राहक उपभोग केंद्रित वस्तू्वर आधारित कंपन्यात गुंतवणूक करणार आहे असे एलआयसीने यावेळी स्पष्ट केले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कपातीचा धोरणात्मक निर्णयाचा फायदा सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दरकपात केली. त्यामुळे ग्राहक दरकपातीमुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक उपभोग (Personal Consumption) मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे. भारतातील मूलभूत विकासापलीकडे ग्राहकांची वाढती मागणी उपभोग केंद्रित उत्पादनावर खर्च करण्याची असू शकते. याचाच दीर्घकालीन लाभ गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने हा नवा ओपन एंडेड फंड बाजारात लाँच केला आहे. ३१ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबरपर्यंत हा एनएफओ फंड (New Fund Offer NFO) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर पुन्हा २५ नोव्हेंबरला हा फंड गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. निफ्टी इंडिया कंझमशन टोटल रिटर्न इंडेक्स (TRI) अंतर्गत हा फंड नोंदणीकृत असणार आहे.


एलआयसीने 'प्रहार' ला दिलेल्या माहितीनुसार हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी लाभदायक ठरणार आहे. किमान ५ वर्ष या फंडांमध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना आकर्षित परताव्यासाठी आवश्यक आहेत असे म्हटले. यापुढे एलआयसी म्युच्युअल फंडाने दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी फंडात गुंतवणूक करताना आपले लक्ष्य आपला आर्थिक ताळेबंद, आपले उद्दिष्ट, त्यासाठी लागणारा कालावधी व दृष्टीकोन राखूनच ही गुंतवणूक करावी असा सल्ला गुंतवणूकदारांना 'प्रहार' शी बोलताना दिला आहे. इक्विटी व इक्विटी संबंधित बेंचमार्कातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही गुंतवणूक होणार आहे असे संबंधितांनी यावेळी सांगितले. याखेरीज गुंतवणूक करताना दीर्घकालीन कमाईसाठी रूपी कॉस्ट अँव्हरेजिंगचे गुणोत्तर ध्यानात ठेवावे असे कंपनीने यावेळी सूचवले. गुंतवणूक करताना गुंतवणूकीची रक्कम अथवा कालावधी यांचा अभ्यास करून अर्थपूर्ण गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते असे यावेळी फंड मॅनेजर मंडळाने स्पष्ट केले. सुमित भटनागर, व करणं दोशी हे फंड मॅनेजर म्हणून या एनएफओचे कामकाज पाहतील.


माहितीनुसार, थीमॅटिक फंड 'एलआयसी एमएफ कंझम्पशन फंड' प्रस्तुत करण्याची घोषणा केली आहे. ग्राहक उपभोग या विषय-संकल्पनेवर आधारित ही एक गुंतवणुकीस कायम खुली समभागांशी संलग्न (ओपन-एंडेड इक्विटी) योजना आहे.ही योजना मागणी आणि उपभोग-संबंधित क्षेत्रांमध्ये किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये सक्रियपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओमधून दीर्घकालीन भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. योजनेचे उद्दिष्ट त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी ८० ते १००% निधी हा देशांतर्गत वापर-चालित मागणीचा फायदा घेण्यासाठी तयार असलेल्या कंपन्यांच्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये विभागण्याचे आहे. निधी व्यवस्थापक योजनेच्या मालमत्तेपैकी २० टक्क्यांपर्यंत उपभोग प्राथमिक संकल्पनेच्या (थीम) बाहेर गुंतवणूक करण्याचा अधिकार राखून ठेवतो. शिवाय, ही योजना वेगवेगळ्या बाजार भांडवलात वैविध्यपूर्ण गुंतवणूक करेल. तथापि, योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी नाही.एनएफओ दरम्यान, अर्ज करण्यासाठी / स्विच इनसाठी किमान रक्कम ५००० रूपये असून त्यानंतर १ रूपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. दैनिक एसआयपीसाठी किमान रक्कम १०० रुपये आणि मासिक एसआयपी २०० रुपये आहे. किमान तिमाही एसआयपी रक्कम १००० रुपये आहे. एसआयपी सुरू होण्याची तारीख योजना पुन्हा खुली झाल्यानंतर लागू होईल. कंपनीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन असून, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी असे यावेळी स्पष्ट केले.


प्रस्तुत एनएफओवर भाष्य करताना एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. झा म्हणाले आहेत की,'आम्ही एक उपभोग संकल्पनेवर आधारीत फंड सुरू करत आहोत, कारण येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात ग्राहक उपभोग वाढण्याची अपेक्षा आहे. भारताच्या उपभोग प्रवणतेला चालना देणारी कारणे म्हणजे वाढता मध्यमवर्ग, निरोगी काम करणाऱ्या वयाची मोठी लोकसंख्या, दरडोई उत्पन्नांतील वाढ, गतिमान शहरीकरण आणि डिजिटलायझेशन अशी आहेत. देशातील विशालतम मध्यमवर्गीय विभाग भारताला उपभोग शक्तिकेंद्र बनवण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, आमचा नवीन फंड किरकोळ गुंतवणूकदारांना एक चांगली संधी देत आहे जी या चक्राचा फायदा घेऊ शकेल'.


एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी-इक्विटी योगेश पाटील म्हणाले आहेत की,' जागतिक व्यवस्थेतील धोरणात्मक स्थिती, मजबूत मूलतत्त्वे, निरंतर सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणा आणि उत्कृष्ट जीडीपी वाढ लक्षात घेता, भारताची उपभोगातील तेजी एक दशक किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारतातील विवेकाधीन खर्चात वाढ आणि श्रेणींमध्ये प्रीमियमीकरणाचा स्पष्ट प्रवाह आढळून येत आहे. वाढत्या आकांक्षा असलेला मध्यमवर्गीय गट, वाढते क्रयक्षम उत्पन्न आणि विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या पसंतींमुळे हे बदल घडत आहेत. एकत्रितपणे, हे घटक विशेषतः प्रीमियम आणि जीवनशैली विभागातील उपभोग हा गुंतवणूक क्षेत्रात एक प्रमुख आणि टिकाऊ विषय बनवू शकतात.'


'रोटी कपडा मकान' यापलीकडे जाऊन भारत डिसक्रेशन आधारित लक्झरी उत्पादन खरेदीकडे आपला कल नोंदवत आहे. भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्नासह राहणीमानात सुधारणा होत आहे. गेल्या काही वर्षांत ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उपभोगात मोठी वाढ सातत्याने होत आहे. त्यातून झालेल्या जीएसटी कपातीचा फायदा ग्राहक बाजारात होताना दिसतो. दिवाळीतील सर्व्हेच्या आधारे, ४५००० कोटींहून अधिक किंमतीची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत झाली. यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली होती. एल आयसीने दिलेल्या माहितीनुसार, या एनएफओचे उदिष्ट इक्विटी व संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ग्राहकांना यांचा दीर्घकालीन फायदा करून देणे असल्याचे म्युच्युअल फंड कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पवईतील आर ए स्टुडिओमध्ये थरार, शूटिंगच्या नावाखाली ओलीस ठेवलेल्या १७ मुलांची सुटका, एन्काउंटरमध्ये आरोपी ठार

मुंबई : पवई परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. ‘शूटिंग ऑडिशन’च्या नावाखाली सुरू असलेल्या

देशात एआय क्रांतीला गती देण्यासाठी रिलायन्स आणि गुगल बनले नवे भागीदार

प्रति युजर ३५१०० किमतीच्या जिओ वापरकर्त्यांना १८ महिन्यांचा गुगल एआय प्रो अँक्सेस मोफत भारतात संस्थांना एआय

पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पवईत शूटिंगच्या नावाखाली निष्पाप मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Q2FY26 Results Update: ह्युंदाई मोटर, अदानी पॉवर, सिप्ला, स्विगीचा तिमाही निकाल जाहीर जाणून घ्या ठळक माहिती एका क्लिकवर

मोहित सोमण:आज अनेक कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. नुकतेच ह्युंदाई, अदानी पॉवर, सिप्ला,

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

विश्वासार्ह ब्रँड्सच्या नावांचा गैरवापर करून होते फसवणूक  मुंबई:नोकरीच्या वाढत्या स्पर्धेत उमेदवारांना

पवईत शूटिंगच्या बहाण्याने २५ मुलांना खोलीत डांबले, अखेर सुरक्षा पथकाने केला गोळीबार

मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू