मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 1.57 लाख नवीन ग्राहकांची भर घातली आहे. तर एअरटेलने 52 हजार 255, वोडाफोन-आयडियाने 50 हजार 504, आणि बीएसएनएलने 34 हजार 610 नवीन ग्राहक जोडले असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.

जिओने मागील तीन महिन्यांपासून आपल्या ग्राहकसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली आहे. उच्च गतीचे इंटरनेट, स्वस्त प्लॅन आणि विस्तारित कव्हरेजमुळे ग्रामीण भागातदेखील जिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. एअर फायबर सेवांनाही वाढता प्रतिसाद:

ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सक्रिय जिओ एअर फायबर वापरकर्त्यांची संख्या 5,52,265 इतकी झाली आहे. तुलनेत एअरटेलचे सक्रिय फायबर ग्राहक 2,00,813 इतके आहेत. जलद इंटरनेट स्पीड, ऑनलाईन शिक्षण आणि घरून काम (Work From Home) संस्कृतीमुळे या सेवेची मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र हे दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य राज्य ठरत असून, डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यात खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' नाही!

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; नियमात तरतूद नसल्याचे स्पष्टीकरण, विरोधकांना मोठा झटका मुंबई: महाराष्ट्र

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती