IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी ३३९ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान ५ विकेट राखत पूर्ण केले.


भारतीय महिला संघाच्या जेमिमा रॉड्रिग्जने ठोकलेल्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार केले आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. जेमिमाने या सामन्यात १२७ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला. त्याआधी स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांनीही चांगल्या खेळी केल्या.


३३९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची सुरूवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा केवळ १० धावा करून बाद झाली. यानंतर १०व्या षटकांत स्मृती मंधाना बाद झाली. तिने २४ धावा केल्या. दरम्यान, यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी १८्या षटकांत भारताची धावसंख्या १०० पार पोहोचवली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. मात्र ३६व्या षटकांत भारताला तिसरा झटका बसला तो हरमनप्रीतच्या रूपात. ती ८९ धावा करून परतली. यानंतर दीप्ती शर्माने चांगली खेळी केली. मात्र ४१व्या षटकांत ती २४ धावा करून बाद झाली. मात्र दुसरीकडे जेमिमा खेळतच होती. तिने ११५ चेंडूत शतक ठोकले. यानंतर ४६व्या षटकांत ऋचा बाद झाली. ती १६ बॉलमध्ये २६ धावा करून गेली. त्यानंतर हा विजय भारताच्या हातात होता.



ऑस्ट्रेलियाची फलंदाजी


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर ३३९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. फीबी लिचफिल्ड आणि एलिसा हिली यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. लिचफिल्डने तुफानी फलंदाजी करत ११९ धावा केल्या. एलिस पेरी (७७ धावा) आणि ॲश्ले गार्डनर (६३ धावा) यांनीही मोठी भूमिका बजावली. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच