ओडिशा: 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. या लाटांच्या जोराने एका जहाजाचा सांगाडा नासिरू किनाऱ्यावर पाण्यात तरंगताना दिसू लागला आहे. बंगालच्या उपसागरात, ओडिशातील गहीरमाथा समुद्री अभयारण्याजवळ हे जहाज बुडालेल्या स्थितीमध्ये आढळले होते. ते जहाज आता चक्रीवादळामुळे नासिरू किनाऱ्याजवळून दिसू लागले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाच्या रचनेवरून ते ब्रिटिशकालीन असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. साधारणपणे भरतीच्या वेळी हे अवशेष पाण्याखाली जात आहेत. आता चक्रीवादळामुळे समुद्रातील हालचालींना वेग आल्याने या जहाजाचा सांगाडा अधिक स्पष्टपणे बाहेर आल्याचे दिसत आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक ...
सुमारे दहा वर्षांपूर्वीही या जहाजाचे अवशेष दिसले होते, पण नंतर ते पुन्हा समुद्रात गडप झाले. आता चक्रीवादळामुळे ते पुन्हा वर आले आहेत. हे जहाज कुठून आले, कधी आणि कोणत्या कारणामुळे बुडाले, याबद्दल अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






