ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका (T20 Series) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना मेलबर्नमध्ये (Melbourne) होणार असतानाच, त्यापूर्वी एक दु:खद घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात १७ वर्षीय तरुण क्रिकेटपटू बेन ऑस्टिन (Ben Austin) याचा सरावादरम्यान चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व (Cricket World) हादरले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील या घटनेनंतर अधिकृत निवेदन (Official Statement) जारी करून दुःख व्यक्त केले आहे. युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे सध्या क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
डोक्याला चेंडू लागला अन्...
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराच्या पूर्व भागात ही हृदयद्रावक घटना घडली. युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन (Ben Austin) याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपशील समोर आला आहे. बेन ऑस्टिन हा नेट प्रॅक्टिसदरम्यान फलंदाजी करत होता. दुर्दैवाने, त्याच वेळी चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन लागला. चेंडू लागल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस जीवन-मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर, म्हणजेच आज, ३० ऑक्टोबर रोजी गुरुवारी, त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट समुदायात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने मंदिरावर ...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून शोक व्यक्त
मेलबर्नमध्ये सरावादरम्यान दुर्देवी अपघातात १७ वर्षीय युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन याचा मृत्यू झाल्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट व्हिक्टोरियाने शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे की, "१७ वर्षीय मेलबर्न क्रिकेटर बेन ऑस्टिनच्या निधनाने आम्ही स्तब्ध आहोत." "नेट्समध्ये सराव करताना झालेल्या या अपघाताने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं आहे," असेही त्यांनी नमूद केले. क्रिकेट व्हिक्टोरियाने देखील शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, "आमच्या संवेदना ऑस्टिन कुटुंबीयांसोबत, त्याच्या सहकाऱ्यांसोबत आणि फर्नट्री गली क्रिकेट क्लब तसेच संपूर्ण व्हिक्टोरियन क्रिकेट समुदायासोबत आहेत." या दुर्देवी घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट समुदायात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सरावादरम्यान अपघात, रुग्णालयात जीवन-मृत्यूची झुंज निष्फळ
युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन हा फर्नट्री गली क्रिकेट क्लब (Ferntree Gully Cricket Club) आणि एल्डन पार्क यांच्यातील स्थानिक टी-२० सामन्यापूर्वी नेट्समध्ये वॉर्म-अप करत असताना ही दुर्देवी घटना घडली. सरावादरम्यान चेंडू डोक्यावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ मदत केली आणि प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात त्याला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रिंगवुड अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (Ringwood and District Cricket Association) अध्यक्ष मायकेल फिन (Michael Finn) यांनी ऑस्टिनच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, वैद्यकीय पथकाच्या सर्व प्रयत्नांनंतरही बेन ऑस्टिनला वाचवता आले नाही आणि त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट जगताला हादरवणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधील सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर (Safety Issues) गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.