Thursday, October 30, 2025
Happy Diwali

मराठी चित्रपटांना दाक्षिणात्य टच ; आफ्टर ऑपेरेशन 'लंडन कॅफे'मध्ये झळकणार हे कलाकार

मराठी चित्रपटांना दाक्षिणात्य टच ; आफ्टर ऑपेरेशन 'लंडन कॅफे'मध्ये झळकणार हे कलाकार

मुंबई : 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची काही काळापासून चर्चा सुरू आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके हे कलाकार या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण भारतात मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांचं पोस्टर पाहून या चित्रपटात आपल्याला ऍक्शन पाहायला मिळणार हे नक्की

हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह या सिनेमात प्रशांत खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार रुक्मिणी सुतार या मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात दिसणाऱ्या मराठी कलाकारांनी शूटिंग करण्याआधी कानडी अर्थात कन्नड भाषा शिकून घेतली तर कानडी अर्थात कन्नड कलाकारांनी शूटिंग सुरू होण्याआधीच मराठी भाषा शिकून घेतली.

'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी 'दिपक राणे फिल्म्स' आणि 'इंडियन फिल्म फॅक्टरी' अंतर्गत केली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण आर.डी. नागार्जुन यांनी केले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरात मराठी हिंदी कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment