‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार


नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनात आज, बुधवारी रात्री मोठी घडामोड घडली. शासनाच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर रात्री 9.30 वाजता कडू यांनी आंदोलन कायम ठेऊन मुंबईत गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.

नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी मंगळवारी नागपूर- हैदराबाद महामार्ग 44 रोखून धरल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (सुमोटो-कॉग्निजन्स) दखल घेत बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्ता मोकळा करून गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करत कॉटन फेडरेशनच्या शेजारी असलेल्या मैदानावर ठिय्या मांडला. याठिकाणी संध्याकाळी 6 वाजता बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो आहे. सरकार आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, आपण वेळ द्यावी, चर्चेतून मार्ग निघेल. यावर बच्चू कडू यांनी दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी बोला आणि फोन लावा आणि कर्जमुक्तीबाबत हो आहे की नाही याबाबत विचारा असे सांगितले. तसेच आम्ही शांत बसलो की सरकार शांत होते. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही 4 वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवे होते, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असे पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. जर तोडगा निघाला नाही किंवा आम्हाला चुना लावण्याचा प्रयत्न केला, तर आल्यानंतर थेट रेल रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

Comments
Add Comment

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या