अहमदाबाद: अहमदाबादमधील एका टेलरला लग्नाच्या कार्यक्रमासाठी वेळेत ब्लाउज शिवून न दिल्याबद्दल मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
नवरंगपुरा येथील एका महिलेने टेलरविरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, अहमदाबाद ग्राहक विवाद निवारण आयोगाने टेलरला ग्राहकाला ₹7000 हून अधिक रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय घडले?
सीजी रोडवरील दुकानात काम करणाऱ्या टेलरला महिलेने ब्लाउज शिवण्यासाठी ₹4,395 रुपये आगाऊ दिले होते. टेलर वेळेवर काम पूर्ण करेल या विश्वासावर त्यांनी ही रक्कम दिली होती. परंतु, टेलरने वेळेत ब्लाउज दिला नाही, ज्यामुळे महिलेला त्रास सहन करावा लागला. ग्राहक आयोगाने टेलरला भरपाई म्हणून ₹4,395 रुपये आगाऊ रक्कम वार्षिक 7% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त, मानसिक त्रास आणि खटल्याच्या खर्चासाठी म्हणून टेलरला ग्राहकाला अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल.