वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली आहे. तिने न्यूझीलंडविरुद्धच्या शतकी खेळीच्या बळावर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. विश्वचषकातील शानदार प्रदर्शनामुळे मानधनाचे रेटिंग तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्तरावर पोहोचले आहे. तिची सहकारी, प्रतिका रावलने १२ स्थानांची मोठी झेप घेतली आहे.


स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध १०९ धावांची खेळी केली. तर बांगलादेशविरुद्ध नाबाद ३४ धावा केल्या. ती ८२८ रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम असून, दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲश्ले गार्डनर (७३१) पेक्षा ती तब्बल ९७ गुणांनी पुढे आहे. १२ स्थानांची झेप घेऊन प्रतिका रावल ५६४ रेटिंगसह २७व्या स्थानावर पोहोचली आहे, परंतु दुर्दैवाने, दुखापतीमुळे ती आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. स्मृतीने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली होती आणि तिची सप्टेंबर २०२५ साठी ‘आयसीसी महिला प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली होती.


दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ड्ट दोन स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध ९०, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१ धावांची खेळी केली होती. दरम्यान, इंग्लंडच्या ॲमी जोन्सने ‘टॉप-१०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ती ४ स्थानांची झेप घेऊन ९व्या (६५६) क्रमांकावर पोहोचली आहे. ॲनाबेल सदरलँडने ‘टॉप ४०’ मध्ये सर्वात मोठी झेप घेतली आहे. ती १६ स्थानांनी पुढे सरकत १६वे स्थान गाठले आहे.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा