“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला पाठवलेला सुट्टीचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण या कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी दिलेलं कारण ऐकून सर्वजण अचंबित झाले आहेत. त्याचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि त्याने थेट त्याच कारणासाठी १० दिवसांची रजा मागितली.



काय होतं त्या ईमेलमध्ये?


Knot Dating या कंपनीचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जसवीर सिंग यांनी हा ईमेल सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी म्हटलं, “मला माझ्या करिअरमधला सर्वात प्रामाणिक ईमेल मिळाला.”


“हॅलो सर, अलीकडेच माझं ब्रेकअप झालं आहे आणि त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. मी आज घरून काम करतो आणि २८ ते ८ तारखेपर्यंत सुट्टी हवी आहे.”


जसवीर सिंग यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं, “Gen Z पिढी कोणतेही फिल्टर वापरत नाही. ते जे अनुभवतात, ते स्पष्टपणे सांगतात.” त्यांनी या रजेचा अर्ज लगेच मंजूर करत दोनच शब्दांत उत्तर दिलं “Leave approved, instantly.”





जसवीर सिंग यांची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि तिला ३.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. हजारो युजर्सनी या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं.
एका युजरने लिहिलं, “हे कारण इतकं खरं आहे की त्यापेक्षा काही चांगलं सांगणं शक्य नव्हतं.”
तर दुसऱ्याने गंमतीने म्हटलं, “भाई, लग्नासाठीही लोक इतकी मोठी सुट्टी घेत नाहीत.”
तर काहींनी सीईओच्या संवेदनशीलतेचंही कौतुक करत लिहिलं, “बॉस समजूतदार असेल तर कर्मचारीही मनापासून काम करतो.”


साधारण १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्यांना Gen Z म्हटलं जातं. ही पिढी मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियासोबत वाढलेली आहे. ती आपल्या भावना लपवत नाही, कोणताही दिखावा न करता थेट बोलते. मानसिक आरोग्य आणि वर्क-लाईफ बॅलन्सला ही पिढी विशेष महत्त्व देते.


जसवीर सिंग यांच्या मते, “ही पिढी कामाच्या ठिकाणी भावनांबद्दल बोलायला घाबरत नाही. ते स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दलही स्पष्ट असतात आणि हेच त्यांच्या प्रामाणिकतेचं लक्षण आहे.”


काहींनी या ईमेलला "Gen Z पिढीच्या पारदर्शकतेचं उत्तम उदाहरण" म्हटलं आहे, तर काहींनी विनोदाने घेतलं. मात्र एक गोष्ट निश्चित, नवीन पिढी भावना दडवून ठेवत नाही, त्या व्यक्त करते, आणि हेच त्यांचं वेगळेपण ठरलं आहे.

Comments
Add Comment

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

Danish Chikna : दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटला NCB चा झटका! डोंगरीतील 'ड्रग्स फॅक्टरी' सांभाळणारा दाऊदचा खास माणूस दानिश चिकनाला गोव्यातून अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) ड्रग्स सिंडिकेटला मोठा झटका बसला आहे. दाऊदचा जवळचा हस्तक आणि

Droupadi Murmu : ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'राफेल'मध्ये स्वार; लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती!

हरियाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल (Rafale) लढाऊ